चेन्नई: बॉलिवूड विश्वातील दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रविवारी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. रविवारी अचानक ए. आर. रहमान यांच्यात छातीत दुखू लागलं होतं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी त्यांच्या अँजिओग्राफीचे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे पथकही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.बॉलिवूड गाजवणाऱ्या बड्या संगितकाराची अशी अचानक प्रकृती बिघडल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत. सध्याच्या घडीला रहमान यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत डॉक्टरांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.