धक्कादायक! पंतप्रधान पोषण शक्ती योजनेतून दिल्या जाणाऱ्या मिलेट चॉकलेट बारमध्ये अळ्या, धाराशिवच्या जि.प. शाळेतील प्रकार
धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे निघाल्याने खळबळ उडाली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिले जातात ज्वारी, बाजरी पासून तयार केलेले मिप्लेट न्यूट्रेटिव्ह बार दिले जातात. विद्यार्थ्यांना पोषणतत्त्व असलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार म्हणून दिल्या जाणान्या चिक्क्यांमध्ये अळ्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये अल्या आणि किडे निघाल्याची तक्रार पालकांनी केल्यानंतर चॉकलेट वाटप बंद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ही चॉकलेट महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांना पुरवली जातात. मात्र, निकृष्ट दर्जाचे अन्नपुरवठा होत असल्याचे समोर येत आहे. घटनेची गंभीर दखल घेत शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र विक्कड यांनी तात्काळ चॉकलेट वाटप थांबवले आहे. तसेच संपूर्ण अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याऱ्यांकडे पाठवणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकारामुळे शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.