वडूज : पत्रकार तुषार खरात यांच्यावर गुन्हा दाखल करताना कोणतीही खातरजमा न करता अटक केली. त्या निषेर्धात खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पोलीस व तहसिलदारांना लेखी निवेदन दिले. यावेळी औंध, मायणी , कातरखटाव व वडूजचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी
राहुल धस, दहिवडी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व तहसिलदार बाई माने
यांना संघटनेच्यावतीने लेखी निवेदन देण्यात आले.
माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार व ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची यूट्यूब चॅनेलचे संपादक तुषार खरात यांनी विविध बातम्या प्रसिद्ध करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर हक्काभंग दाखल केला. व्यक्तिगत बदनामी गुन्हा दाखल करणे हे क्रमप्राप्त होते. मात्र, अँट्रासिटी, खंडणी व विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून खरात यांना अटक करण्यात आली.
वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाने संबधित गुन्ह्याची खातरजमा करणे आवश्यक होते. सुडबुद्धीने एखाद्या पत्रकाराला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असताना हुतात्मा भूमी म्हणून राज्याला परिचीत असणार खटाव तालुका येथील पत्रकार हा अन्याय कदापीही सहन करणार नाहीत यासाठी लोकशाहीच्या मार्गाने विविध तिव्र आंदोलने उभारण्याचा इशारा खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला.या अन्यायाविरोधात पत्रकार तुषार खरात यांनी तुरुंगातच अन्न-पाणी त्याग केल्याची माहिती सुत्रांकडून समजताच राज्यातील पत्रकारांच्यात शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने त्यांच्यावर व त्यांच्या कुटूंबावर दडपशाही पद्धतीने होणारया अन्यायाविरोधात शासनाने तातडीने दखल घेऊन लोकशाहीतील महत्वपूर्ण घटकाला न्याय दयावा, अशी मागणी ही खटाव तालुका पत्रकार संघाने केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.