धुळे : १३ हजारांची लाच घेताना उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यकाला धुळ्याच्या लाचलुचपत पथकाने सोमवारी (दि.१०) रंगेहाथ अटक केली. गौण खनिज वाहतूक केल्याच्या प्रकरणात आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी त्याने लाच मागितली होती. तक्रारदार यांच्या चुलत भावाचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांचे
वाळुचे टॅक्टर २४ फेब्रुवारी रोजी मौजे कोकले (ता. साकी) शिवारात वाहतूक
करताना महसुल विभागाच्या भरारी पथकाने पकडला होता. त्यानंतर या टॅक्टरचा
पंचनामा करुन तहसिलदार साकी कार्यालयात जमा केले होते. तहसिलदार साकी यांनी
या ट्रॅक्टरवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी
धुळे कार्यालयात अहवाल पाठविला होता.
तक्रारदार हे त्यांच्या भावाच्या सांगण्यावरुन ५ मार्च २०२५ रोजी ट्रॅक्टरची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी येथे गेले असता तेथे हजर असलेले महसुल सहाय्यक दिनेश वाघ यांनी टॅक्टरवर १ लाख २५ हजार रुपये दंडाची नोटीस काढली. या आकारणी केलेल्या दंडाची रक्कम उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्याकडून कमी करुन देण्यासाठी तकारदार यांच्याकडे १५ हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात तक्रार दिली. त्यानंतर तडजोडीअंती १३ हजार देण्याचे ठरले. त्यानुसार १३ हजाराची लाच घेताना पंचासमक्ष सापळा रचून लाचलुचपत विभागाने महसुल सहाय्यक दिनेश सुर्यभान वाघ यांना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.