Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार
 

महाराष्ट्र पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. 20 वर्षीय गतिमंद विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उाडली. पोलिसांनी या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात ही घटना घडली आहे. शेतात जळतणाचे लाकडं आणण्यासाठी गेलेल्या एका 20 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाला आहे. 3 मार्चला ही घटना घडली आहे.

20 वर्षीय विवाहित महिला शेतात लाकडं आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी कठोरा बाजार येथील आरोपी सद्दामखा अजमेरखा पठाण, सादिकखा शफीकखा पठाण आणि फारुखा जीलाणी खा पठाण या तीन नराधमांनी महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर महिलेला धमकी दिल्यानं महिलेनं घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही.

मात्र, 20 मार्च रोजी रात्री उशीरा महिलेनं भोकरदन पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींच्या मुसक्या आवळत न्यायालयासमोर हजर केलं असता आरोपींना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.