पुणे: गेल्या काही काळापासून पुणे विविध गुन्हेगारीच्या घटनांनी सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोन आयटी इंजिनिअर तरुण-तरुणीला उडवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. या प्रकरणी सर्व स्तरातून टीका
झाली. ही घटना ताजी असताना आता पुण्यात आणखी एका बड्या बापाच्या पोराचा
कारनामा समोर आला आहे.
पुण्यातील येरवडा परिसरात एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवली आहे. एवढंच नव्हे तर त्याने भर सिग्नलवर कार थांबवून अश्लील चाळे केले आहेत. संबंधित तरुण सिग्नलवर कार थांबवून रस्त्याच्या बाजुला लघुशंका करत होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ही बाब आरोपी तरुणाला समजल्यानंतर त्याने कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील चाळे केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात घडली आहे. ज्यावेळी तरुण गाडीतून उतरुन लघुशंका करत होता. तेव्हा तिथे काही महिला देखील असल्याची माहिती आहे. तरीही हा बड्या बापाचा निर्लज्ज पुत्र स्त्रियांच्या समोरच उभं राहून लघवी करत होता. दुसरा एक तरुण गाडीत बसून होता. त्याच्या हातात देखील दारुची बाटली होती. हा व्हिडीओ काढत असताना दोघांनी व्हिडीओ काढणाऱ्यासोबत मुजोरी केली.हा सगळा प्रकार घडल्यानंतर मद्यधुंद असलेले हे दोन्ही तरुण गाडी घेऊन भरधाव वेगाने वाघोलीच्या दिशेने गेले. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता सर्व बाजुनी टीका होत आहे. या बड्या बापाच्या पोरांवर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.