Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! सरकारी कार्यालयात लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राची 500 रुपयांची स्टॅम ड्युटी माफ ; कोट्यवधी नागरिकांना दिलासा

Breaking News ! सरकारी कार्यालयात लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राची 500 रुपयांची स्टॅम ड्युटी माफ ; कोट्यवधी नागरिकांना दिलासा




राज्यातील शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रकासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशदेखील त्यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यापुढे एका साध्या कागदावर सेल्फ अटेस्टेड अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकणार आहे. दहावी बारावीचा निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी लागणारा खर्च जवळपास 3 ते 4 हजार रुपयांचा असतो. या निर्णयामुळे आता हा खर्च वाचणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

नेमका निर्णय काय आहे ?

राज्यात कोणतेही शासकीय काम असो किंवा सरकारी परीक्षेचा अर्ज, नागरिकांना त्या कामासाठी जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र अशी प्रतिज्ञापत्रके जोडावी लागतात. या प्रतिज्ञापत्रकांसोबत एक 500 रुपयांचे मुद्रांकशुल्कही भरावे लागते. विशेषतः दहावी बारावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांचा ही सर्व प्रमाणपत्र लागतात. या प्रतिज्ञापत्रकांसाठी लागणारा साधारण 3-4 हजार रुपयांचा खर्च आता वाचणार आहे. आता या प्रतिज्ञापत्रकांसोबत भरावे लागणारे 500 रुपयांची स्टॅम्प ड्यूटी आता माफ करण्यात आली आहे.

कोणत्या प्रतिज्ञापत्रांसाठी निर्णय लागू होणार?

जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. या सर्व प्रमाणपत्रांना जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क आता जोडावे लागणार नाही. त्या ऐवजी एका साध्या कागदावर 'सेल्फ अटेस्टेड अर्ज लिहून ही प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळवता येणार आहेत. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.