Breaking News! पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी केली पूर्ण ट्रेनच हायजॅक; रेल्वेत लष्कर, ISI चे कर्मचारी 6 सैनिक ठार
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी संपूर्ण ट्रेन हायजॅक केली आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या वतीने बोलानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले आहे. यात शंभरपेक्षा जास्त लोकांना ओलीस ठेवल्याच दावा केला जात आहे.
जर त्यांच्याविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई सुरू झाली तर ते ट्रेनमधील सर्वांना ठार मारून टाकतील, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आतापर्यंत 6 सैनिक शहीद देखील झाले आहेत. तर ट्रेनमध्ये आतापर्यंत 120 प्रवाशी असल्याचा दावा केला जात आहे.
बीएलएने एक निवेदन केले जारी
बीएलएने एका निवेदनात म्हटले आहे की आमच्या सैनिकांनी मश्काफ, धादर आणि बोलानमध्ये या कारवाईची योजना आखली आहे. रेल्वे ट्रॅक उडाला आहे, ज्यामुळे जाफर एक्सप्रेस थांबली आहे. यानंतर आमच्या सैनिकांनी ही ट्रेन ताब्यात घेतली आणि प्रवाशांना ओलीस ठेवले. जर आमच्याविरुद्ध लष्करी कारवाईचा प्रयत्न झाला तर आम्ही सर्व ओलिसांना मारून टाकू. या हत्याकांडाची जबाबदारी पाकिस्तानी लष्कराची असेल.
2 वर्षांपूर्वी जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट झाला होता
16 फेब्रुवारी 2023 रोजीही पेशावरहून क्वेट्टाला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट झाला होता, ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता. ट्रेन चिचावतनी रेल्वे स्थानक ओलांडत असताना हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने स्वीकारली. जाफर एक्सप्रेस क्वेट्टा आणि पेशावर दरम्यान धावते. 25 आणि 26 ऑगस्ट 2024 च्या रात्री, बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने कोलपूर आणि माच दरम्यानचा पूल उडवून दिला. त्यानंतर रेल्वे सेवा बंद करण्यात आली. 11 ऑक्टोबर 2014 पासून रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.