विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमधील निकालावर संशय उपस्थित करण्यात आला होता. नंतर महाविकास आघाडीच्या तब्बल 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.
मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघात फेर मतमोजणी तूर्तास होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवले आहे. या पत्रात विधानसभा निवडणुकीत मतमोजणीवर हरकत घेतलेल्या मतदारसंघांमध्ये होणाऱ्या प्रतिरूप मतमोजणीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्थगित देण्यात आली आहे. हा आदेश म्हणजे एक प्रकारे फेरमतमोजणीची मागणी करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना झटका मानला जातो.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर 31 जिल्ह्यामधील 45 मतदारसंघातील तब्बल 104 पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याची मागणी केली होती. त्यासाठी फेर मतमोजणीचा अर्जही जिल्हा निवडणूक आयोगाकडे केला होता. यातील काही उमेदवारांनी तर जिल्हा निवडणूक आयोगाकडे फेर मतमोजणीची मागणी करण्याबरोबरच उच्च न्यायालयातही याचिका देखील दाखल केली होती.परंतु आता सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमशी संबंधित दाखल याचिकांवरील निकालानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात ईव्हीएम प्रतिरूप मतमोजणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे फेरमतमोजणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.आतापर्यंत राज्यात फक्त मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांमधीलच चार ठिकाणी फेर मतमोजणी झाली आहे. अद्यापही पुणे जिल्ह्यातील खडकवासला आणि हडपसर, रायगडमधील अलिबाग, कोल्हापूरमधील चंदगड आणि कोल्हापूर उत्तर, नाशिकमधील येवला, ठाण्यातील ठाणे, कोपरी पाचपाखाडी, डोंबिवली, तर बीडमधील माजलगाव, धुळ्यातील धुळे ग्रामीण या आठ जिल्ह्यांतील 11 मतदारसंघांमधील ईव्हीएम प्रतिरुप मतमोजणी प्रलंबित आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.