यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचं समोर येत आहे. सिद्धाराम सालीमठ यांची साखर आयुक्तपदी बदली झाल्याने नगरची जागा रिक्त होती. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या
बदल्यांचा धडाका सुरूच आहे. आता देखील आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या
बदल्यांचे आदेश जारी करण्यात आलेत. त्यामध्ये एमएमआरडीएचे सहआयुक्त
राधाविनोद शर्मा यांची मीर भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती
करण्यात आलीय. तर उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास अधिकारी एम जे प्रदीप
चंद्रेन यांची बदली पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आलीय.
वैदेही रानडेंकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आलंय. तेव्हापासूनन वरिष्ठ प्रशासनाचा खांदेपालट जोरदार गतीने सुरू आहे. आधी राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असल्याचा दिसतंय. त्याचाच भाग म्हणून आता पुन्हा आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?
1. राधाविनोद शर्मा यांची मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.2. एम.जे. प्रदीप चंद्रेन यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.3. बाबासाहेब बेलदार यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.4. जगदीश मिनियार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.5. गोपीचंद कदम यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.6. वैदेही रानडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.7. डॉ. अर्जुन चिखले यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.8. डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.