Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रशासनातील खांदेपालट थाबंता थांबेना! मध्य प्रदेशातील अंजली रमेश हिंगोलीत तर सांगलीचे आयुक्त नागपुरात; पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

प्रशासनातील खांदेपालट थाबंता थांबेना! मध्य प्रदेशातील अंजली रमेश हिंगोलीत तर सांगलीचे आयुक्त नागपुरात; पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
 
 
मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन साडेतीन महिन्यांचा काळ उलटून गेला तरी प्रशासनातील खांदेपालट काही थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये पालघर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एच पालवे यांची बदली मुंबईतील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ येथे व्यवस्थापक संचालकपदी करण्यात आली आहे. तर मनोज रानडे यांची बदली पालघर सीईओ म्हणून करण्यात आली आहे.

2020 बॅचच्या मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी अंजली रमेश यांना महाराष्ट्रात आणण्यात आलं असून त्यांच्याकडे हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.

: - कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?

1. बी.एच. पालवे (आयएएस: एससीएस: 2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांना महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. मनोज रानडे (आयएएस: एससीएस: 2024) संचालक, नगर प्रशासन, मुंबई यांना जिल्हा परिषद, पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3. शुभम गुप्ता (आयएएस: आरआर: 2019) महानगरपालिका आयुक्त, सांगली यांना विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

4. अंजली रमेश. (आयएएस: आरआर: 2020) संवर्ग मध्य प्रदेशातून महाराष्ट्र संवर्गात बदली जिल्हा परिषद, हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. झेनिथ चंद्र देवंथुला (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

या आधी कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?
आंचल गोयल (आयएएस:आरआर:2014) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर यांची मुंबई शहर, मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अंकित (आयएएस:आरआर:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मीनल करनवाल (आयएएस:आरआर:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हा परिषद, जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कवली मेघना (आयएएस:आरआर:2019) प्रकल्प संचालक, आयटीडीपी, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड यांची जिल्हा परिषद, नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

करिश्मा नायर (IAS:RR:2021) प्रकल्प संचालक, ITDP, जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रणजित मोहन यादव (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा उपविभाग, गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.