Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जामा मशिदीच्या प्रमुखाला अटक, चौकशीसाठी आलेल्या SIT ने थेट घरातून उचललं

जामा मशिदीच्या प्रमुखाला अटक, चौकशीसाठी आलेल्या SIT ने थेट घरातून उचललं
 
 
संभल : उत्तर प्रदेशच्या संभल हिंसाचारप्रकरणी आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई झाली आहे. जामा मशिदीचे प्रमुख सदर जफर अली याला अटक करण्यात आली आहे. 24 नोव्हेंबर 2024 ला संभलमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. याप्रकरणाच्या चौकशीनंतर सदर जफर अलीला अटक करण्यात आली आहे. थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी पोलिसांनी सदर जफर अलीला राहत्या घरातून ताब्यात घेतलं. 24 नोव्हेंबरला झालेल्या हिंसाचारप्रकरणी एसआयटीने सदर जफर अलीची चौकशी केली होती.

सदर जफर अली शाही जामा मशीद कमिटीचा वकील आहे. 24 नोव्हेंबरला झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता. सदर जफर अलीला अटक करताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरात पीएसी आणि आरआरएफ सह मोठ्या प्रमाणावर पोलीस बल तैनात करण्यात आलं आहे. सदर जफर अलीच्या अटकेनंतर पोलिसांनी फ्लॅग मार्चही केला.

जामा मशिदीच्या सर्व्हेवेळी हिंसाचार
24 नोव्हेंबर 2024 ला जामा मशिदीच्या सर्व्हेवेळी संभलमध्ये हिंसाचार झाला होता. संभलच्या जामा मशिदीमध्ये हरिहर मंदिर होतं, जे 1529 साली बाबरने पाडलं, असा दावा हिंदू पक्षकारांचा आहे. याप्रकरणी 19 नोव्हेंबर 2024 ला संभल कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यानंतर सिव्हिल जज सीनियर डिव्हिजन आदित्य सिंग यांनी जामा मशिदीच्या आत सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर टीम सर्व्हे करायला जामा मशिदीमध्ये पोहोचली तेव्हा बाहेर हिंसा भडकली, या हिंसाचारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी संभल हिंसाचारप्रकरणी 50 पेक्षा जास्त जणांना जेलमध्ये पाठवलं आहे, ज्यात अनेक महिलांचाही समावेश आहे. पण पहिल्यांदाच जामा मशिदीमधल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.