१९ वर्षांच्या तरुणीवर अत्याचार! जैन मुनी शांतीसागर महाराजांना १० वर्षांची शिक्षा
 

नवी दिल्लीः दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांच्यावर १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत १० वर्षांच्या तरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २०१७ मधील हे प्रकरण आहे. दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज हे नागपूर येथील उपाश्रयात वास्तव्याला होते. पीडित तरुणीचं कुटुंब महाराजांचं भक्त होतं. महाराजांनी पूजाविधीच्या बहाण्याने पीडित तरुणीला सुरतच्या आश्रमामध्ये बोलावलं होतं. कुटुंबासोबत तरुणी सुरतमध्ये दाखल झाली.

एका रात्री शांतीसागर महाराजांनी पूजेचं निमित्त करुन तरुणीला खोलीमध्ये बोलावलं आणि कुटुंबातील सदस्यांना खोलीबाहेर उभं राहण्यास सांगितलं. याचवेळी तरुणीवर महाराजाने बलात्कार केला. या प्रकरणी घटनेच्या १३ दिवसांनतर तरुणीने सुरतमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यापूर्वी महाराजाने तरुणीला नग्न फोटो पाठवण्यास सांगितलं होतं.

या प्रकरणी ३३ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय तपासणी आणि फॉरेन्सिक रिपोर्टनुसार आरोप सिद्ध करण्यात आले. शुक्रवारी सुरत सत्र न्यायालयाने आरोपी जैन मुनी शांतीसागर यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.