Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

२४ एप्रिल २०२५ रोजी जैन समाजाचा सांगली कलेक्टर ऑफिसवर भव्य आक्रोश मोर्चा..

२४ एप्रिल २०२५ रोजी जैन समाजाचा सांगली कलेक्टर ऑफिसवर भव्य आक्रोश मोर्चा..
 

मुंबई :- विलेपार्ले मुंबई जैन मंदिर उध्वस्त केलेल्या महानगरपालिका प्रशासनाचा बैठकीत निषेध. जैन समाज अन्याय खपवून घेणार नाही. समाजाच्या बैठकीत दक्षिण भारत जैन सभेचा निर्णय.
 
सांगली दि. १९ : विलेपार्ले पूर्व मुंबई येथे ३२ वर्षापुर्वीपासून असलेले जैन मंदिर तडकाफडकी मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोझर लावून जमीनदोस्त केले. या हिंसक व अन्यायी कारवाईने देशातील व महाराष्ट्रातील अहिंसक जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने संपूर्ण राज्यात जैन समाजामध्ये असंतोष धुमसत आहे.

मंदिर पाडताच सांगलीतील जैन समाजाचा असंतोष उफाळून आला. आज दक्षिण भारत जैन सभेने आयोजित केलेल्या सकल जैन समाजाच्या बैठकीत मुंबई महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने मंदिर उध्वस्त केलेल्या महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे तातडीने निलंबन करावे व होते त्याच ठिकाणी जैन मंदिर पुनर्निर्माण करावे असा एकमताने ठराव पारित करण्यात आला. मंदिर पाडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ.... गुरुवार, दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सांगली कलेक्टर ऑफिसवर भव्य असा जैन समाजाचा आक्रोश मोर्चा काढण्याचे ठरले. सकाळी ९ वाजता विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून प्रारंभ होईल व कलेक्टर ऑफिस समोर मोर्चाचे सभेत रुपांतर होऊन मा. जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देण्याचे ठरले. 

या बैठकीत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्यमहामंत्री डॉ अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, महामंत्री प्रा. एन डी बिरनाळे, डॉ. सी एन चौगुले, शशिकांत राजोबा, डी. ए. पाटील, डॉ जयपाल चौगुले, स्वरूप पाटील (यड्रावकर), वकील शीतल मदवांना व रोहन मेहता इत्यादींनी मंदिर पडल्याचे घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि २४ तारखेच्या आक्रोश मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करीत यापुढे असा अन्याय जैन सामाज्यावर होऊ नये म्हणून कायदेशीर व रस्त्यावरची लढाई जोरदारपणे लढू असे सांगितले. या बैठकीत राहुल चौगुले, सुरेश पाटील, महावीर खोत, जतीन शहा, पोपटलाल डोर्ले, जनगोंडा थोटे, बाबासाहेब पाटील, दीपक पाटील, अनिता पाटील, सुरेखा पाटील, चांदणी आरवाडे, पत्रकार पल्लवी पाटील, अजित सकळे, श्रीपाल चौगुले, अजित बिरनाळे, सुहास पाटील व सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दिगंबर श्वेतांबर व अन्य समाजातील घटकाचे समाजाचे कार्यकर्ते व श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.