जैन समाजाचं मंदिर पाडलं, अधिकाऱ्याला चुकवावी लागली मोठी किंमत; महापालिका आयुक्तांनी दिले 'हे' महत्त्वाचे आदेश
नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा मंगळवारी रात्री हटवण्यात आला. यानंतर त्याठिकाणी दगडफेकीसह जाळपोळीच्या घटना घडली होती.यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुसरीकडे मुंबईतील विलेपार्ले
परिसरातील जैन समाजाच्या एका मंदिरावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात
आली होती. पण आता ही कारवाई केलेल्या अधिकाऱ्याला मोठी किंमत चुकवावी
लागली आहे.
मुंबई महापालिकेनं मुंबईतील विलेपार्ले परिसरातील पार्श्वनाथ दिगंबर जैन समाजाचं मंदिर दोन दिवसांपूर्वी पाडण्यात आल्यामुळे मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या मंदिर हटवण्याच्या कारवाईनंतर जैन समुदायात मोठा असंतोषाचं पसरला होता. त्यामुळे महापालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी
जैन मंदिर पाडणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला निलंबित करण्यासंबंधीचे आदेश
दिले आहेत.नवनाथ घाडगे असे निलंबन करण्यात आलेल्या महापालिका अधिकाऱ्याचे
नाव आहेत.
मंदिर पाडण्यात आल्यानंतर जैन समाजाकडून महापालिकेच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी(ता.19) अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हेही सहभागी झाले होते. जैन समाजाकडून काढण्यात आलेल्या रॅलीत स्थानिक नेत्यांसह जैनबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅलीत महिलांचा समावेशही लक्षणीय होता. या रॅलीतील जैन नागरिकांच्या हातात 'मंदिर तुटा,हौसला नाही',असे फलक असल्याचेही दिसून आले. आता महापालिकेनं जैन बांधवांना मोठा दिलासा देताना या मंदिरात पूजा करण्यासाठी परवानगी दिली आहे.जैन बांधवांनी रॅलीआधी तोडलेल्या मंदिरामध्ये आरती केली, या आरतीनंतर आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपस्थित जैन आंदोलकांकडून हे मंदिर पुन्हा बांधून देण्याची मोठी मागणीही करण्यात आली. या आंदोलनानंतर काही वेळातच महापालिकेकडून मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.विशेष म्हणजे हे मंदिर 90 वर्ष जुनं होतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.