Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विचित्र अपघात! डुक्कर आडवं आलं, कार टँकरला धडकली, पोलीस कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

विचित्र अपघात! डुक्कर आडवं आलं, कार टँकरला धडकली, पोलीस  कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू
 

वर्ध्यामध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. डुक्कर आडवे आल्यामुळ कारचे नियंत्रण सुटले अन् टँकरला धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय. अपघात इतका भीषण होता की माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला.

उपचारावेळी बाप-लेक दगावले. वर्धा येथील समुद्रपूर वर्धा मार्गावरील तरोडा शिवारातील मध्यरात्री १ वाजता हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या वडिलांना नागपूरला आणि मुलीला सेवाग्राम येथे उपचरासाठी दाखल केले होते. पण उपचारावेळी दोघांचीही प्राण ज्योत मालवली. प्रियंका प्रशांत वैद्य (वय 37),प्रियांश प्रशांत वैद्य (वय 8 वर्ष ),प्रशांत मधुकर वैद्य (43 वर्ष ) व माही प्रशांत वैद्य (3 वर्ष ) अशी मृतकांची नावे आहेत.

प्रशांत मधुकर वैद्य हे कारने वर्ध्याला येत होते, त्यावेळी रात्री एक वाजताच्या आसपास अपघात धाला. वैद्य यांच्या कारला अचानक डुक्कार धडकले त्यामुळे कारवरील ताबा सुटला. कार थेट जाऊन टँकरला धडकली. या अपघातामध्ये प्रियंका आणि प्रियांश यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेले प्रशांत वैद्य आणि माही यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.
 
कारचालक प्रशांत वैद्य हे पोलीस कर्मचारी आहेत. ते वर्धा येथील वडनेर ठाण्यात कार्यरत होते. ते कुटुंबासोबत कारने तरोडा गावाजवळून कारने वर्धेला निघाले होते. त्यावेळी अचानक कारसमोर डुक्कर आडवे आले. डुकराला कारची धडक लागून कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरला जाऊन धडक दिली. घटनेत घटनास्थळीच पत्नी व मुलाचा मृत्यू झालाय तर कारचालक पती व मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यांना सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे मुलीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला तर वडिलांचा नागपूरच्या एम्स रुग्णालयात मृत्यू झाला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.