Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे सातारा रस्त्यावर ससेवाडी येथे बसला आग, संपूर्ण बस जळून खाक

पुणे सातारा रस्त्यावर ससेवाडी येथे बसला आग, संपूर्ण बस जळून खाक
 

खेड-शिवापूर : येथील पुणे सातारा रस्त्यावर ससेवाडी फाट्यावरील उड्डाणपुलावर गुरुवारी दुपारी एका प्रवासी वाहतूक कारणाऱ्या खासगी बसने पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागण्याचे कारण समजले नाही, मात्र आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सदर प्रवासी वाहतूक करणारी ही खासगी बस साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने निघाली होती.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ससेवाडी फाट्यावर मायक्रो कंपनी समोरील उड्डाणपुलावर ही बस आली. यावेळी चालकाला बसच्या मागील भागाला आग लागल्याचे आरशात दिसले. ते पाहून बस बाजूला थांबवून तत्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे या आगीत कोणालाही ईजा अथवा दुखापत झाली नाही. आग लागण्याचे कारण समजले नाही.
 
मात्र आगीने क्षणार्धात उग्र स्वरूप धारण केले. काही वेळातच संपूर्ण बस या आगीत जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पेट्रोलिंग पथक ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वाहतुकीचे नियंत्रण केले.शेजारील डब्ल्यूओम कंपनीची आग विझविणारी यंत्रणा आणि सुरक्षा रक्षक यांनी या बसला लागलेली आग विझवली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.