Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन, वयाच्या ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन, वयाच्या ८८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 

ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या न्युमोनिया झाल्यानंतर फुफ्फुसांना संसर्ग झाला होता. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

व्हेटिकनकडून पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची माहिती देण्यात आलीय. इस्टर संडेचं सेलिब्रेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. पोप फ्रान्सिस यांनी २०१३ मध्ये पोप पदाची जबाबदारी स्वीकारली होती. ईसा मसीह यांच्यानंतर कॅथॅलिक धर्मात सर्वात मोठं पद पोप हे आहे. ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वात मोठे धर्मगुरू मानले जातात.जगातला सर्वात लहान देश असणाऱ्या व्हॅटिकन सिटीतून पोप राज्यकारभार चालवतात. पोप हेच व्हॅटिकन सिटीचे राष्ट्राध्यक्ष मानले जातात. जगभरातील १.२ अब्जापेक्षा जास्त कॅथलिक ख्रिश्चनांचे ते सर्वोच्च अध्यात्मिक गुरू असतात.
600 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पोपचा राजीनामा

पोप हे पद आजीवन असतं. मात्र २०१३ मध्ये फ्रान्सिस यांच्या आधीचे पोप बेनेडिक्ट यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरच फ्रान्सिस यांची पोप पदी निवड झाली होती. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच पोपने पद सोडल्याची घटना घडली होती.
 
पोप कोणाला होता येतं?
कॅथलिक असलेल्या आणि बाप्तिस्मा विधी झालेल्या कोणत्याही पुरुषाला पोप होता येतं. बाप्तिस्मा हा कॅथलिक विधी असून तो झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला कॅथलिक मानलं जातं.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.