Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुपारी फोडून साखरपुडा करुन शारीरीक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देऊन तरुणीची केली फसवणुक

सुपारी फोडून साखरपुडा करुन शारीरीक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देऊन तरुणीची केली फसवणुक


पुणे :दोन्ही कुटुंबामध्ये बैठक होऊन लग्न करण्याचे निश्चित करण्यात आले. सुपारी फोडून साखरपुडाही केला. या दरम्यान त्यांच्यात शारीरीक संबंध निर्माण झाले. दरम्यानच्या काळात त्यांच्यात मतभेद झाल्याने त्याने आता लग्नास नकार देऊन तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका २६ वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी वैभव देवीदास बनसोडे  (वय ३२, रा. स्वागत कॉर्नर, भारती विद्यापीठ परिसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


हा प्रकार नोव्हेंबर २०२४ ते २४ फेबुवारी २०२५ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कुटुंबात बैठका होऊन त्यांच्यात सोयरिक जुळविण्यात आली. सुपारी फोडून लग्न निश्चित केले गेले. त्यानंतर त्या दोघांचा साखरपुडा २०२३ मध्ये दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, लग्नाची तारीख ठरली नव्हती. दोघेही परस्परांना भेटत होते. या दरम्यान नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर आता फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांच्यात मतभेद झाल्याने वैभव बनसोडे याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. दोन्ही कुटुंबामधील चर्चेत काही तोडगा न निघाल्याने आता या तरुणीने लग्नास नकार देऊन फसवणुक केल्याची फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण तपास करीत आहेत. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.