पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले असून, उपचारासाठी आधी दहा लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजप आमदार
अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होत्या, तरीही रुग्णालयाने
वेळेवर उपचार दिले नाहीत. याच प्रकरणामुळे आता शिवसेना आक्रमक होऊन
रुग्णालयाबाहेर राडा सुरु आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे
गटाचे पदाधिकारी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या गेटवर येऊन राडा सुरु आहे.
शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर पैसे फेकले. रुग्णालय प्रशासनाला भेटण्याची
त्यांच्याकडून मागणी केली जाते मात्र पोलिसांनी गेटवर अडवल्यामुळे गोंधळ
सुरू आहे. बाहेर येऊन या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली अशा प्रकारचा निरोप
पोलिसांकडून देण्यात आला.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे ऑडिट करण्यासाठी समिती गठीत केले. समितीसाठी पाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक केले असल्याची माहिती आहे. दीनानाथ मंगेशकर यांना योग्यरिते अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाने आदेश दिले आहेत. समितीचे सदस्य आणि अध्यक्ष स्वतः दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करणार आहेत.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच, राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्यदूत नेमण्याची घोषणा केली असून रुग्णसेवेतील पारदर्शकतेवर भर दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.