सांगली : 'लाचलुचपत'च्या जाळ्यात अडकलेला कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षक संतोष चौधरी याला अटकेनंतर मदत केल्याप्रकरणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी विभागाचे तहसीलदार मनोज ऐतवडे यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. ही कारवाई पुणे विभागाचे आयुक्त डॉ.
चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली. चार दिवसांपूर्वी लाचेची मागणी
केल्याप्रकरणी गुणनियंत्रण अधिकारी चौधरी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
अटक केली होती. अटकेनंतर न्यायालयात आणि त्यानंतर रुग्णालयात मदत केल्याचा
ठपका ऐतवडे यांच्यावर ठेवण्यात आला होता. शिस्तभंगाची कारवाई म्हणून
त्यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. ऐतवडे यांनी सहा महिन्यांपूर्वी संजय
गांधी निराधार योजनेचा पदभार स्वीकारला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.