Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेतील जवाहर चौक येथे गोवा बनावट दारूच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाईएकूण ६.५१,७०० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त,मिरज राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

मिरजेतील जवाहर चौक येथे गोवा बनावट दारूच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई एकूण ६.५१,७०० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त,मिरज राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
 

मिरजेच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मिरजेतील जवाहर चौक येथे गोवा बनावटीच्या दारू तस्करीवर मोठी कारवाई केली आहे मिरजेच्या राज्य उत्पादन शुल्क विभागालामिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पथका कडून मार्फत मिरजेतील जवाहर चौक, देवल कॉम्प्लेक्स  परीसरात सापळा लावुन गोवा राज्य निर्मीत राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मदयाची अवैधरीत्या वाहतूक करणारा 
 
१) महिंद्रा कंपनीचा चारचाकी ट्रक जिचा क्रमांक. MH १० DT २६४७ 
 
२) मारुती सुजुकी कंपनीची A स्टार चार चाकी वाहन MH १० AN ९५१७ व 
 
३) हीरो कंपनीची डिलक्स MH १० BW ९४४७ ही वाहने जप्त करुन कारवाई करण्यात आली. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हयातील महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून आयात करीत असताना विविध प्रकारचे विदेशी मद्य मिळुन आले. सदर मुददेमालामध्ये गोवा राज्य निर्मीत विक्री करत असलेले विविध प्रकारचे विदेशी मद्य एकूण ६१,२००/- रुपये किंमतीचा मद्यसाठा मिळून आला. सदर गुन्हयामध्ये मोबाईल व वाहनासह एकूण रुपये ६५१७००/- इतक्या किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्यामध्ये वाहनचालक सागर मोहनराव साबळे रा. बेडग गणेश संजय शिंदे सुभाषनगर मलगोंडा महादगोंडा पाटील रा. नदीवेस प्रवीण अशोक पाटील रा. ढवळी अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) ८०,८१,८३,९०, व १०८ अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपी इसमानां जागीच अटक करण्यात आलेली आहे.

सदर कारवाई निरीक्षक दिपक बाळकृष्ण सुपे,अजय लोंढे,लक्ष्मण पोवार, दुय्यम निरीक्षक जयसिंग खुटावळे,राज्य उत्पादन शुल्क,  उदय पुजारी, जवान स्वप्नील अटपाडकर, विनायक खांडेकर, हणमंत निळे, कविता सुपने, शाहीन शेख, तसेच वाहन चालक स्वप्नील कांबळे आदींनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक  दिपक बाळकृष्ण सुपे, हे करीत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.