Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राला हादरवणारे रॅकेट, तुळजापुरातील पुजारीही ड्रग्स रॅकेटमध्ये सामील, मंदिर संस्थानाने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्राला हादरवणारे रॅकेट, तुळजापुरातील पुजारीही ड्रग्स रॅकेटमध्ये सामील, मंदिर संस्थानाने घेतला मोठा निर्णय



तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. ड्रग्ज तस्करात मंदिरातीलच 11 पुजाऱ्यांची नावे समोर येत आहेत. पुजाऱ्यांचाच या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे. मंदिर संस्थान आरोपी पुजाऱ्यांवर कायमची प्रवेश बंदी करणार असून मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. या यादीतील काही पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

 
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात गेल्या 3 वर्षांपासुन ड्रग्ज तस्करी सुरु असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई कठोर केली आहे. राज्यभरात हे जाळं पसरलंय का त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे. याच दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत पुजाऱ्यांचेही कनेक्शन समोर आले आहे. राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याची ही नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील अकरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे.

 

तुळजाभवानी मंदिर प्रशासन आता या पुजाऱ्यांवर कायमची बंदी घालणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा यांनी पोलिसांना पत्र देऊन तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. ही यादी प्राप्त होताच ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी पुजाऱ्यांवर देऊळ ए कवायत या मंदिर संस्थांच्या कायद्यानुसार कायमची मंदिर प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. आरोपी पुजाऱ्यांची नावे वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.