काळजी घ्या! स्क्रीन टाइममुळे 'या' गंभीर आजाराचा धोका
संपूर्ण जगभरात स्क्रीन टाइमच्या (Screen time) अतिरेकामुळे डोळ्यांवर होणाऱ्या ताणाचे गंभीर परिणाम समोर येत आहेत. २०५० पर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या मायोपियाने ग्रस्त होण्याची शक्यता आहे. सध्या सुमारे ३०% लोक या समस्येला सामोरे जात आहेत. मोबाईल, टॅबलेट आणि संगणक यांसारख्या डिजिटल उपकरणांच्या सतत वापरामुळे मानवी डोळ्यांवर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. विशेषतः मायोपिया अर्थात दूरदृष्टी कमी होण्याची समस्या प्रचंड वेगाने वाढत आहे. सध्या जगभरात ३०% लोक मायोपियाचे शिकार झाले आहेत. संशोधनानुसार, २०५० पर्यंत ही टक्केवारी ५०% पर्यंत जाऊ शकते.
हे लक्षणीय आहे की, डिजिटल उपकरणांचा अधिक वापर करणाऱ्या लहान वयाच्या मुलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळून येते. स्क्रीनकडे अधिक वेळ पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. यामुळे डोळ्यांचे नैसर्गिक स्नायू कमकुवत होतात आणि दृष्टी हळूहळू धूसर होऊ लागते. याच कारणामुळे इंटरनॅशनल मायोपिया इन्स्टिट्यूटने ही चिंता व्यक्त केली आहे.डिजिटल आय स्ट्रेनचे पाच दुष्परिणाम
विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये हा धोका अधिक दिसून येत आहे. ३९% मुले मायोपियाग्रस्त असल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांच्यात चष्म्याचा वापर लवकर सुरु होतो. याचबरोबर शिक्षण व करिअरमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढते.
मानसिक थकवाः सतत स्क्रीनकडे पाहिल्याने मेंदूवर ताण येतो आणि झोपेच्या वेळेत अडथळा निर्माण होतो.
डोकेदुखीः डोळ्यांचा ताण मेंदूपर्यंत पोहोचल्याने डोकेदुखी सुरु होते. धूसर दृष्टी: स्क्रीनकडे पाहून पाहून फोकस कमकुवत होतो.
डोळ्यांचा कोरडेपणाः स्क्रीनच्या प्रकाशामुळे डोळ्यातील नैसर्गिक ओलसरपणा कमी होतो.
डोळ्यांचे सतत पाणावणे किंवा खाज येणे: स्क्रीनचा ताण डोळ्यांना अस्वस्थ करतो.
मायोपियाचा वाढता प्रादुर्भाव (टक्केवारीनुसार अंदाज)
2000: 22.9%
2010: 28.3%
2020: 33.2%
2030: 38.0%
2040: 44.8%
2050: 49.8%
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.