डिजिटल मंत्रिमंडळासाठी फडणवीस सरकारचा कोटींचा घाट; पण, RTI कार्यकर्ते कुंभारांनी ठेवलं 'मर्मा' वर बोट
देशातील वाटचाल आता डिजीटल युगाकडे होत असून केंद्र सरकार देखील यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. तर आता महाराष्ट्र सरकारने देखील " ई-कॅबिनेट प्रणाली" पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकरिता मंत्रिपरिषदेतील सर्व सदस्यांसाठी 50 ॲपल आयपॅड खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 1 कोटी 16 लाख 65 हजार रुपये
खर्च येणार आहे. सरकारच्या या निर्णयावर आता RTI कार्यकर्ते आणि महाराष्ट्र
आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी
एक्सवर पोस्ट करत फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
त्यांनी ट्विट करत राज्य सरकारमधील अनेक मंत्री अजूनही अधिकृत ईमेल आयडी वापरत नाहीत मात्र तरीही सरकार "ई-कॅबिनेट प्रणाली" पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकरिता मंत्रिपरिषदेतील सर्व सदस्यांसाठी सरकारने 50 ॲपल आयपॅड खरेदी करणार आहे. अशी टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या "ई-कॅबिनेट"साठी "हाय-टेक" आयपॅड! महाराष्ट्र राज्यातील अनेक मंत्री अजूनही अधिकृत ईमेल आयडी वापरत नाहीत.मात्र "ई-कॅबिनेट प्रणाली" पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याकरिता मंत्रिपरिषदेतील सर्व सदस्यांसाठी सरकारने 50 ॲपल आयपॅड खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय!
यासाठी खर्च 1 कोटी 16 लाख 65 हजार रुपये येणार आहे. सरकार
म्हणतं आहे. डिजिटल मंत्रिमंडळ हवंय. हरकत नाही. मात्र मंत्रीही लवकरच
डिजिटल साक्षर होतील अशी अपेक्षा करूया, आता तरी सर्व मंत्री अधिकृत ईमेल
आयडी वापरतील आणि "स्मार्ट" निर्णय घेतील अशी अपेक्षा करूया. अशी टीका त्यांनी या ट्विटमध्ये राज्य
सरकारवर केली आहे. RTI कार्यकर्ते आणि महाराष्ट्र आम आदमी पक्षाचे
उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी या ट्विटसोबत राज्य शासनाचा एक जीआर देखील
पोस्ट केला आहे. ज्यामध्ये राज्य सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.