Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-महिलेची साडेचार लाखांची फसवणूक; समाजमाध्‍यमातून संपर्क साधत 'वर्क फ्रॉम होम'च्या नावाखाली गंडा

सांगली :- महिलेची साडेचार लाखांची फसवणूक; समाजमाध्‍यमातून संपर्क साधत 'वर्क फ्रॉम होम'च्या नावाखाली गंडा
 

सांगली : 'वर्क फ्रॉम होम'चे आमिष दाखवून सांगलीतील एका महिलेची साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी समाज माध्यमांतून संपर्कात आलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुकय्या तौफिक पटेल (बालाजीनगर, गेट क्र. ३ च्या समोर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा प्रकार ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रुकय्या पटेल या गृहिणी आहेत. ३० जानेवारी रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून मोबाईल कॉल आला. संबंधित व्यक्तीने रुकय्या यांना घरबसल्या नोकरी देण्याचे आमिष दाखविले. याकरिता काही रक्कम भरायला लागेल, असे सांगितले. परंतु रुकय्या यांनी 'ऑनलाइन' पैसे देणार नसल्याचे स्पष्ट केले. तेव्हा, संशयिताने त्यांना टेलिग्राम ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्या माध्यमातून काही लिंक पाठविल्या.  त्या माध्यमातून संशयिताने 'ऑनलाइन' पटेल यांच्या बॅंक खात्यातील ४ लाख ५० हजारांची रक्कम परस्पर काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यावर रुकय्या यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.