Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल


रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल


जम्मू- काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशती हल्ल्यावरून संपूर्ण देशात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. तर, काही ठिकाणी मुस्लिमांचे पाकिस्तानबद्दलचे प्रेमही स्पष्टपणे दिसून आले.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही असाच प्रकार पाहायला मिळाला. मुंबईतील विलेपार्ले रेल्वेस्थानकाबाहेर पायऱ्यांवर पाकिस्तानी झेंडा लावला. यानंतर तिथून जाणाऱ्या एका मुस्लीम महिलेने ते पाहिले आणि लोकांशी वाद घालायला सुरुवात केली. पुढे महिलेने स्वतः पायऱ्यांवरून पाकिस्तानी ध्वज काढले.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकावर ४ मे २०२५ रोजी घडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा निषेध करण्यासाठी विले पार्ले स्थानकाबाहेर काही रिक्षाचालकांनी पायऱ्यांवर पाकिस्तानी झेंडे लावले. यानंतर तिथून जाणाऱ्या एका महिलेने आणि तिच्या मुलाने गोंधळ घातला. तसेच पाकिस्तानी झेंडे काढायला सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी याचा निषेध केला. तेव्हा महिलेने त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. व्हिडिओत संबंधित महिला तुम्ही पाकिस्तानचा झेंडा जमिनीवर का लावला? असा प्रश्न विचारत आहे.

पायऱ्यांवर लावलेले पाकिस्तानी ध्वज काढताना महिलेने तिथे उपस्थित असलेल्या लोकांना पोलिसांची धमकी दिली. मला कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला. तर, मी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करेल, असे त्या महिलेने म्हटले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यांनुसार, या घटनेनंतर पोलिसांनी स्वतःहून ते झेंडे काढून टाकले.

व्हिडिओमध्ये दिसणारी महिला कुठे राहते किंवा ती कुठून आली? हे कोणालाही माहिती नाही. ती महिला दुसऱ्या ठिकाणाहून रेल्वे स्थानकावर आली, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली. मात्र, पोलिसांनी अद्याप या प्रकरणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.