शुभमन गिल नाहीतर, 'या' बॉलिवूड स्टारला डेट करतेय सचिन तेंडुलकरची लेक? अनेकदा एकत्र स्पॉट झालंय 'कपल'
बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचं नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा नवेलीशी जोडलं जात होतं. पण मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धांत
चतुर्वेदी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट
करत आहे. याआधी सारा तेंडुलकर शुभमन गिलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या
सुरू होत्या. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याच्याही चर्चांनीही जोर धरला
होता.
फिल्मफेअरनं दिलेल्या वृत्तानुसार,
सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे.
अशातच दोघांच्या डेटिंगच्या बातम्याही समोर येऊ लागल्या आहेत. मीडिया
रिपोर्टनुसार, सिद्धांत आणि सारा दोघेही अलिकडेच रिलेशनशिपमध्ये आले आहेत
आणि त्यांना त्यांचं नातं खाजगी ठेवायचं आहे.
'ही तर सिद्धांत आणि साराच्या मैत्रीची सुरुवात...'
सुत्रांनी
दिलेल्या माहितीनुसार, "सिद्धांत आणि सारा दोघांच्या मैत्रीची सुरुवात
हल्लीच झाली आहे, पण दोघांमधील केमिस्ट्री खूपच चांगली आहे. सध्या दोघेही
एकमेकांची कंपनी एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, दोघेही
एकमेकांसोबत कंफर्टेबल दिसत आहेत. त्यांना आपल्या नात्याबाबत कोणताही
खुलासा करायचा नाही. दोघांनाही सुंदर नातं जपायचं आहे."
सारा तेंडुलकरचं नाव यापूर्वी क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं जात होतं. अनेकदा लाईव्ह सामन्यादरम्या शुभमन गिलला 'सारा वहिनी' म्हणत चिडवलं जायचं. पण, त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान, सर्व चर्चांनी जोर धरलेला असतानाच, क्रिकेटपटूनं स्पष्ट केलंय की, तो सध्या कोणालाही डेट करत नाही.रणवीर सिंहच्या 'गली बॉय' चित्रपटातून सिद्धांत चतुर्वेदीला खूप प्रसिद्धी मिळाली. हा अभिनेता शेवटचा 'युध्रा' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत मालविका मोहनन देखील दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता सिद्धांतकडे 'धडक 2' आहे, ज्यामध्ये तो तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय तो 'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग' मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जया बच्चन आणि वामिका गब्बी देखील असतील. दरम्यान, दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.