Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

UPI युजर्स सावधान! १ ऑगस्टपासून बॅलन्स तपासण्यावर नवा नियम, वाचा सविस्तर माहिती

UPI युजर्स सावधान! १ ऑगस्टपासून बॅलन्स तपासण्यावर नवा नियम, वाचा सविस्तर माहिती
 

ध्या भारतात डिजीटल पेमेंट मोठ्या प्रमाणात लोक करत आहेत. त्यामध्ये UPI पेमेंटचा वापर अगदी वाण्यापासून ते मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत केला जातो. यामध्ये आपण किती पेमेंट केले? किती पैसे शिल्लक राहिलेत? याबद्दल एका मिनिटांत जाणून घेऊ शकतो. मात्र आता यामध्ये काही बदल करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे बदल 1 ऑगस्टपासून करण्यात येणार आहेत. याची माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून देणात आली आहे. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

NPCI च्या नव्या आदेशानुसार, UPI पेमेंटचे काही नियम फॉलो केले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्या कारवाया पुढील प्रमाणे आहेत.
१. ३१ ऑगस्टपर्यंत एनपीसीआय लेखी पद्धतीने त्यांना आश्वासन द्यावे लागेल की, सर्व API विनंत्या रांगेत ठेवतील आणि त्यांचा वेग कमी करतील.

२. ग्राहकांच्या परवानगीशिवाय API व्यवहार सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९.३० या दरम्यान बंद राहतील.
 
३. सतत बॅलन्स तपासणे टाळण्यासाठी बॅंकांना सगळ्यांच्या व्यवहारासोबत शिल्लक रक्कम पाठवावी लागेल.
ऑटोपेमेंटचे नवे नियम

३१ जुलैपासून सगळ्या UPI ग्राहकाना खात्यातील रक्कम तपासण्यासाठी अॅपवरून फक्त ५० वेळाच अनुमती देऊ शकणार आहेत. तसेच जे व्यापारी व्यक्ती आहेत त्यांना खात्यातील रक्कम व्यवहाराची माहिती तपासण्यात अडचणी येऊ शकतात. असे केल्याने IIPI प्रणाली व्यवस्थित वापरता येणार आहे. शिवाय UPI पेमेंटमुळे, सबस्क्रिप्शनमुळे पैसे कापले जाणे या सेवा सुरळीत राहतील. फक्त नॉन-पीक अवर्समध्ये काम करेल. ऑटोपेमेंटसाठी तुम्हाला १ किंवा जास्तीत जास्त ३ प्रयत्न करता येतील.
 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.