Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'त्या' आमदाराचा तरुणीसोबतचा अश्लील व्हिडीओ तुफान व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ!

'त्या' आमदाराचा तरुणीसोबतचा अश्लील व्हिडीओ तुफान व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ!
 

बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील बखरी विधानसभेचे सीपीआय आमदार सूर्यकांत पासवान पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. पासवान यांचा एका तरुणीसोबतचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडालीय. व्हायरल झालेले दोन वेगवेगळे व्हिडीओ फेसबुकच्या माध्यमातून समोर आले आहेत. या व्हिडीओत आमदार तरुणीसोबत विचित्र अवस्थेत दिसला आहे.

आमदार सूर्यकांत पासवान यांनी दिली मोठी प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार सूर्यकांत पासवान यांनी माध्यमांशी बोलताना याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं. हे संपूर्ण प्रकरण एक षडयंत्र असल्याचं ते म्हणाले आहेत. हा व्हिडीओ पूर्णपणे एडिटेड आहे आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्लॅन आहे. त्यांनी म्हटलं की, नुकतच बखरी डीएसपी आणि ड्रग्ज माफियांच्या मिलिभगतबाबत मी डीजीपी यांच्याकडे तक्रार केलो हीत. ड्रग्ज माफियांविरोधात त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे, त्यामुळेच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आमदार पासवान यांनी दावा केला आहे की, त्यांच्या तक्रारीवरून डीजीपी यांनी बेगूसराय-खगडिया रेंजच्या डीआयजींना याप्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. हे प्रकरण त्यांच्या प्रतिष्ठेचच नाही, तर सत्यासाठी लढणाऱ्या प्रतिनिधिंना भीती दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. बखरी पोलीस प्रशासन आणि डीआयजी रेंजकडून आतापर्यंत या प्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीय.

बिहारमध्ये कधी होऊ शकतात निवडणुका?
बिहारमध्ये नितिश कुमार यांच्या सरकारचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2020 ला सुरु झाला होता. तो आता 22 नोव्हेंबर 2025 ला संपणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका याआधी घेतल्या जातील. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान आचारसंहिता लागू होऊ शकते, असं म्हटलं जात आहे. तर मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया ऑक्टोबरपासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान पूर्ण केली जाऊ शकते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.