हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
हरियाणा केडरच्या आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले आहे. तब्येत बरी नसल्याने त्या सुट्टीवर होत्या. सप्टेंबर २०२३ पासून त्या हरियाणा एसीबीच्या पोलीस अधिक्षक पदावर कार्यतर होत्या.
स्मिती चौधरी यांचे पती राजेश कुमार हे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. स्मिती या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांचे पती राजेश कुमार हे सध्या नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक आहेत. 1998 मध्ये स्मिती यांचा राजेश कुमार यांच्यासोबत विवाह झाला होता. स्मिती या माजी आयएएस अधिकारी जयवंती शेओकंद यांच्या कन्या होत्या. नाशिकमध्ये उपचार सुरु असताना शुक्रवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली, यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असता स्मिती यांचे निधन झाले.स्मिती चौधरी २००४ मध्ये पोलीस विभागात डीएसपी म्हणून रुजू झाल्या होत्या. पंचकुला येथेही डीएसपी म्हणून काम केले. यासोबतच त्यांनी विविध जिल्ह्यांत काम केले आहे. हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील डुमराखान कलान गावात त्यांचा जन्म झाला होता. ३१ ऑगस्ट २०३६ रोजी निवृत्त होणार होत्या. त्यांचे आजोबा चौधरी बसंत सिंग श्योकंद यांच्या कुटुंबात ११ हून अधिक सदस्य आयएएस, आयपीएस, कर्नल आणि इतर उच्च पदांवर होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.