Breaking News! सर्वात मोठा Hackers Attack! सोशल मीडिया युजर्सचा डेटा धोक्यात; Facebook, Google चे 16 अब्ज पासवर्ड लीक
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook आणि Google युजर्सची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. Facebook आणि Google चे 16 अब्जहून अधिक पासवर्ड इंटरनेटवर लीक झाल्याची माहिती आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हॅकर अटॅक मानला जात आहे. Cybernews आणि Forbes यांनी सादर
केलेल्या अहवालानुसार, Facebook आणि Google युजर्सचे 16 अब्जहून अधिक
पासवर्ड इंटरनेटवर लीक झाले आहेत. त्यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या
करोडो युजर्सची वैयक्तिक माहिती, ईमेल, सोशल मीडिया आणि बँक अकाउंट्स यांना
धोका निर्माण होऊ शकतो. आजच्या डिजीटल आणि तंत्रज्ञानाने पुढारलेल्या जगात
ऑनलाइन सुरक्षा अत्यंत महत्तावाची आहे. जर आपण सतर्क राहिलो आणि वेळीच
योग्य पावले उचलली तर आपण अशा सायबर हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करू
शकतो. (फोटो सौजन्य - Pinterest)
डेटा लिक होण्यामागे कारण काय आहे?
साइबर सुरक्षा एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, 'infostealers' नावाच्या एका विशेष प्रकारच्या मालवेअरच्या मदतीने जुना डेटा आणि सुव्यवस्थित माहिती चोरण्यात आली आहे. हे मालवेअर तुमच्या डिव्हाईसमधून यूजरनेम आणि पासवर्डची चोरी करते आणि ही माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवतो. यानंतर हॅकर्स ही माहिती स्वत: वापरतात किंवा डार्क वेबवर विकतात.
युजर्सची कोणती माहिती लिक झाली?
या सर्वात मोठ्या सायबर अटॅकमध्ये 16 अब्जहून अधिक पासवर्ड इंटरनेटवर लीक झाले आहेत. याशिवाय इतर माहिती देखील लीक झाली आहे. ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.ईमेल अकाउंट्स (जैसे Gmail)सोशल मीडिया (Facebook, Telegram आदि)डेवलपर टूल्स (GitHub)काही सरकारी पोर्टलवरही लॉगिन देखील लिक झाले आहेतयुजर्ससाठी धोक्याची घंटासर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हे पासवर्ड आता डार्क वेबवर अगदी कमी किंमतीत विकले जाणार आहेत. याचा अर्थ कोणताही सामान्य माणूस ते खरेदी करू शकतो आणि त्यांचा गैरवापर करू शकतो. यामुळे केवळ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सामान्य युजर्सचं नाही तर कंपन्या आणि सरकारी संस्था यांना देखील धोका निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता आता गुगलने लोकांना पासवर्डऐवजी पासकी (Passkeys) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय FBI ने देखील इशारा दिला आहे की, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
सोशल मीडिया युजर्स अशा प्रकारे घ्या तुमची काळजी
सायबर एक्सपर्ट्से सोशल मीडिया युजर्ससाठी काही महत्त्वाचे नियम जारी केले आहेत. ज्यामुळे युजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांची सुरक्षा करू शकतात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे युजर्सनी या घटनेनंतर तात्काळ त्यांच्या सर्व महत्त्वाच्या अकाऊंट्सचे पासवर्ड बदलणं गरजेचं आहे.
प्रत्येक वेबसाईट आणि अकाऊंटसाठी वेगवेगळा आणि मजबूत पासवर्ड सेट करा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) ऑन करा.
पासवर्ड मॅनेजर अॅप्सचा वापर करा.
डार्क वेब मॉनिटरिंग टूल्सचा वापर करून तुमचा डेटा लिक झाला आहे की नाही याबाबत माहिती मिळवा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.