Breaking News! सावकाराचा हैदौस, कर्जदार महिलेच्या लेकीला राजस्थानमध्ये विकलं, आमदार गायकवाडांचा खळबळजनक आरोप
राज्यात अवैध सावकारकीच्यामाध्यमातून शेतकरी, मजूर व गोरगरिबांना त्रास दिला जात असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. आता शिंदे गटाचे आमदारसंजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन एका सावकारावर गंभीर आरोप केले आहेत. कर्ज फेडता आले नाही म्हणून अवैध
सावकारकीचा धंदा करणाऱ्या सावकाराने चक्क कर्जदार महिलेची मुलगी
राजस्थानमध्ये विकायला लावल्याचा खळबळजनक आरोप आमदार गायकवाड यांनी केला
आहे. एका सावकाराविरुद्ध पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केल्याने जिल्ह्यात
एकच खळबळ उडाली.
संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सावकाराकडून आदिवासी बांधवांना, महिलांना होत असलेल्या त्रासाची आणि जाचाची माहिती दिली. विशेष म्हणजे ते स्वतः आमदार आहेत. राज्यात त्यांचे सरकार आहे. गृहमंत्री त्यांचेच आहेत. तरीही एका सावकाराविरुद्ध गंभीर आरोप केले. कर्ज फेडता आले नाही म्हणून अवैध सावकारकीचा धंदा करणाऱ्या सावकाराने कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकायला लावल्याचा खळबळजनक आरोप गायकवाड यांनी केला आहे. तसेच काल-परवा सावकाराने एका बारा
वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केला. बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या
आदिवासीबहुल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकाराचा हैदोस वाढला आहे, असं
सांगत आमदार गायकवाड यांनी सुनील बुरड या अवैध सावकारावर कारवाई करण्याची
मागणी केली.
दरम्यान, अनेकदा अशा प्रकरणात बड्या व्यक्तींना, पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून सावकार आपली पोळी भाजत असतात. त्यामुळे अवैध सावकारकीचा धंदा मांडलेल्यांना वेळीच आळा बसत नाही किंवा त्यांच्यावर कारवाईचा बडगाही उगारला जात नाही. मात्र आता चक्क आमदार महोदयांनी सावकाराविरुद्ध दंड थोपटले आहेत. महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले नाहीत म्हणून सावकाराने गहाण ठेवल्या आहेत. सावकारांनी शेतकऱ्यांच्या बायकांवर, त्यांच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याचा अत्यंत खळबळजनक आरोपही गायकवाड यांनी केला आहे.ते म्हणाले, सावकारकीच्या कायद्याचा गैरवापर करून हे हैदोस घालत आहेत. आम्ही या प्रकरणात उच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ. या आदिवासी गावात सावकार शेतकऱ्यांच्या जमीनी हडप करत आहेत. जो सावकार पैशासाठी मुलीला विकायला लावतो अशा सावकाराची मस्ती सरकारने उतरवावी याबाबत मी विधानसभेत आवाज उठवणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही संजय गायकवाड यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.