Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भ्रष्टाचाराचा कळस ! IAS शुभम गुप्तांचे नवेनवे कारनामे उघडकीस, काय आहेत आरोप?

भ्रष्टाचाराचा कळस ! IAS शुभम गुप्तांचे नवेनवे कारनामे उघडकीस, काय आहेत आरोप?
 

सांगली: सांगली महापालिकेच्या एका लाच प्रकरणात तत्कालीन आएएस अधिकारी शुभम गुप्तांचे नाव पुढे येऊ लागले असून गुप्ता यांना देखील सहा आरोपी करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यानंतर त्यांचे अनेक नवनवे कारनामे समोर येत आहेत. वादग्रस्त ठरलेले शुभम गुप्ता यांच्या अडचणीत येण्याचे नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.

आयएएस अधिकारी शुभम गुप्ता त्यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर गडचिरोली येथील एका भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. त्यानंतर शुभम गुप्ता सांगली महापालिकेचे आयुक्त म्हणून झाले, दरम्यानच्या कार्यकाळामध्ये त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती आता त्यांच्या बदलीनंतर महापालिकेतलेच उपायुक्त असणारे वैभव साबळे एका इमारतीच्या 24 मजली बांधकामासाठी परवानगी घेताना सात लाखांची लाच मागितली म्हणून अटक झाली आहे.


सात क प्रमाणे वैभव साबळे लाचस प्रकरणे अटक झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त शुभम गुप्तांवर तक्रारदार असणारे तानाजी रूईकर यांनी आरोप केले आहेत.सात क प्रमाणे नियमानुसार यात आयुक्त राहिलेले शुभम2 गुप्ता ही आरोपी होऊ शकतात,अशी तक्रार तानाजी रुईकरांकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांचं आणखी एक जुनं प्रकरण सध्या चर्चेत आहेय हे प्रकरण आहे आदिवासी योजनेतील घोटाळा. या घोटाळ्यामध्ये काही गाई म्हशी वाटपामध्ये गैरप्रकार केल्याचं आढळून आले.

गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते. या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गायी म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली. या योजनेत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याची माहिती.लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतःच वळवून घेणं, लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशूवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप होत आहे.

सांगलीत पदभार घेतल्यानंतर काही दिवसातच आयुक्त शुभम गुप्ता यांनी अनेक वादग्रस्त विषय हाताळले याबाबत खासदार विशाल पाटील आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनीही प्रश्न उपस्थित करून तक्रार केली होती यातच त्यांची सांगलीमधून तडकाफडकी बदली झाली होती, महापालिका क्षेत्रातील आरक्षित जागा संपदानाचा जो विषय आहे. त्याबाबतीत सुद्धा आयुक्त गुप्ता यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप झाले.कारण ते एक वर्षाचा कारकीर्द आहे त्याच्यात जर भूमी संपादनाची विषय काढले तर कोट्यावधी रुपये संशयास्पद रित्या मूळ मालकाला न देता वट मुक्तानंदरांना पैसे देऊन त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.

महापालिकेच्या आर्थिक ज्या सर्व ठेवी होत्या ह्या सगळ्या नॅशनलिस्ट बँकेत होत्या मात्र आयुक्त गुप्ता महापालिकेत रुजू झाल्यानंतर त्यांनी शासनाच्या कोणत्या नियमाप्रमाणे सर्व ठेवी म्हणजे साधारण 200 ते 250 कोटी रुपयांच्या ठेवी वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या या प्रायव्हेट बँकेत ठेवल्या त्याच पद्धतीने मक्तेदारांचे चेक काढण्यासाठी 15 ते 17 टक्के पर्यंत टक्केवारी घेऊन ठेकेदारांचे चेक काढलेले आहेत याची सुद्धा सर्व कारकीर्द वादग्रस्त राहिलेले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.