पुणे: अवैध धर्मांतर प्रकरणात अटक करण्यात आलेला जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबाचे कारनामे उघड होऊ लागले आहेत. १०० कोटींची मालमत्ता असलेल्या छांगूर बाबाची चौकशी आता सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) केली जाणार आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्यावर अंगठ्या
आणि खडे विकणाऱ्या छांगूर बाबाकडे आजच्या घडीला १०० कोटी रुपयांची संपत्ती
आहे. छांगूर बाबा आणि त्याच्याशी संबंधित संस्थांच्या बँक खात्यांमधून १००
कोटी रुपयांहून अधिकचे व्यवहार झाल्याची माहिती एटीएसच्या तपासातून समोर
आली आहे.
उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये अवैध धर्मांतरणाच्या मोठ्या रॅकेटचा पदार्फाश झालेला आहे. छांगूर बाबा या संपूर्ण रॅकेटचा प्रमुख आहे. त्याला एटीएसनं अटक केली आहे. त्याची सहकारी नीत रोहरा उर्फ नसरीनला उत्तर प्रदेश एटीएसनं बेड्या ठोकल्या आहेत. तरुणींना फूस लावून छांगूर बाबा त्यांचं धर्मांतर घडवून आणायचा. या नेटवर्कसाठी परदेशांमधून १०० कोटी रुपयांची मदत मिळाल्याची माहिती उघडकीस आलेली आहे. बलरामपूरच्या उटरौलामध्ये बऱ्याच कालावधीपासून धर्मांतराचं रॅकेट चालवलं जात होतं.
पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीनं हिंदू तरुणींच्या धर्मांतरासाठी ठराविक रक्कम निश्चित केली होती. ब्राह्मण, ठाकूर आणि शीख तरुणींच्या धर्मांतरासाठी १५ ते १६ लाख रुपये मिळायचे. ओबीसी तरुणींच्या धर्मांतरासाठी १० ते १२ लाख रुपये दिले जायचे. तर अन्य जातींसाठी ८ ते १० लाख रुपये मिळायचे. छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन बाबा स्वत:ची ओळख हाजी पीर जलालुद्दीन अशी सांगायचा. एजंट्सच्या माध्यमातून तो तरुण मुलींचं धर्मांतर करायचा.छांगूर बाबाची कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आलेली आहे. पुण्याच्या लोणावळ्यात त्यानं एक मालमत्ता खरेदी केली. आपल्या निकटच्या व्यक्ती आणि बलरामपूर सीजेएम कोर्टात लिपिक असलेल्या राजेश उपाध्यायची पत्नी संगीता देवीच्या नावे ही संपत्ती नोंदवण्यात आलेली आहे. एसटीएफ आणि एटीएसच्या तपासातून ही माहिती समोर आलेली आहे.राजस्थान, लखनऊ, बलरामपूर आणि पुण्यापर्यंत धर्मांतर नेटवर्कचं कनेक्शन आहे. छांगूर बाबा गेल्या अनेक वर्षांपासून सिंडिकेट चालवत होता. धर्मांतरासाठी त्याला आखाती देशांमधून कोट्यवधी रुपये मिळायचे. छांबूर बाबानं लोणावळ्यात १६ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली. ही मालमत्ता मोहम्मद अहमद खान, नवीन रोहरा उर्फ जमालुद्दीन आणि बलरामपूरच्या न्यायालयात लिपिक असलेल्या राजेश उपाध्यायची पत्नी संगीता देवीच्या नावे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.