जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...
राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातील ऊंट आता केवळ वाहतुकीचे साधन नसून, सर्पदंशावरील उपाचारासाठी महत्त्वाचा घटक ठरण्याची शक्यता आहे.
एका अभ्यासानुसार, उंटाच्या अश्रूच्या एका थेंबात २६ सापाचं विष निष्प्रभ करण्याची क्षमता असल्याचं पुढे आलं आहे. बिकानेर येथील नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल ने यासंदर्भातील संशोधन केलं आहे. यामुळे सर्पदंशावरील उपचार पद्धतीला आता नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.
NRCC च्या संशोधकांनी राजस्थानधील ऊंटांच्या अश्रूवर यासंदर्भातील प्रयोग केला. यात त्यांना यश आल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे, घोड्यांपासून बनवल्या जाणाऱ्या अँटिव्हेनम पेक्षा ऊंटांच्या अश्रूतून मिळणारे अॅंटिबॉडीज अधिक प्रभावी असल्याचं या संशोधनात दिसून आलं आहे. खरं तर भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे सुमारे ५८ हजार मृत्यू होतो. तर १ लाख ४० हजार जणांना अपंगत्व येतं. विशेषता ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात.
या संशोधनामुळे बिकानेर, जैसलमेर आणि जोधपूर यांसारख्या भागांतील ऊंट पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक संधी निर्माण झाल्या आहेत. NRCC ने स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊंटांचे अश्रू आणि रक्ताचे नमुने नियंत्रित आणि सुरक्षित पद्धतीने काढण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. या बदल्यात शेतकऱ्यांना चांगले आर्थिक मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
एका अंदाजानुसार, शेतकऱ्यांना प्रत्येक ऊंटामागे दरमहा ५ ते १० हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि इतर खासगी औषध कंपन्यांकडून ऊंटांच्या अश्रूंची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे संशोधन मानव कल्याण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.