Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतातील अशी 5 मंदिरे, जिथे प्रसाद म्हणून देताता मांस, मासे आणि दारू; दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात

भारतातील अशी 5 मंदिरे, जिथे प्रसाद म्हणून देताता मांस, मासे आणि दारू; दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात
 
 
भारतात अशी अनेक रहस्यमय मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दल जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. ज्या मंदिरांमध्ये दूरून लोक दर्शनासाठी येत असतात.पण हे फार कमी जणांना माहित असेल की भारतात अशीही 5 मंदिरे आहेत जे मांसाहार प्रसादासाठी प्रसिद्ध आहेत. होय, या मंदिरांमध्ये देवाला केवळ मांस, मासे आणि मद्यच अर्पण केले जात नाही तर भक्तांमध्ये प्रसाद म्हणून ते वाटले जातात.

श्रावण महिना आता सुरु होईल. या महिन्यात बहुतेक लोक या महिन्यात मांस आणि मद्य सेवन करणे टाळतात. या 5 प्रसिद्ध मंदिरे आहेत जिथे देवाला केवळ मांस, मासे आणि मद्यच अर्पण केले जाताता, तसेच ते भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जातात. येथे प्रत्येक मंदिरात भक्तीचे स्वरूपच वेगळे नाही तर प्रसादाच्या परंपराही खूप वेगळ्या आहेत.

मांसाहारी प्रसादासाठी प्रसिद्ध असणारी अशी कोणती 5 मंदिरे आहेत

यातील पहिलं मंदिर आहे कामाख्या मंदिर, आसाम

कामाख्या देवीचं मंदिर हे 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. हे मंदिर आसामच्या नीलाचल टेकड्यांमध्ये आहे आणि नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले आहे. हे मंदिर जगभरात तंत्र विद्याचे केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. येथे आईचे भक्त तिला प्रसाद म्हणून मांस आणि मासे अर्पण करतात. जे नंतर भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जाते. असे केल्याने आई प्रसन्न होते असे मानले जाते.

तारापीठ, पश्चिम बंगाल
 
बंगालमधील बीरभूम येथील तारापीठ मंदिर दुर्गा भक्तांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. येथे लोक मद्यासह देवीला अर्पण केलेले प्राण्यांची बळी देतात. जे नंतर भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जाते.

काळभैरव मंदिर
कालभैरव मंदिरात प्रसाद म्हणून दारू अर्पण केली जाते. ही एक अनोखी परंपरा आहे जी शतकानुशतके चालत आली आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही कालभैरव मंदिरांमध्ये दारू हा मुख्य प्रसाद आहे, जो नंतर भक्तांकडून घेतला जातो. खरं तर, कालभैरव हा तामसिक प्रवृत्तींचे देव मानले जातात म्हणून त्यांना दारू अर्पण केली जाते असं म्हणतात.
कालीघाट मंदिर, पश्चिम बंगाल
 
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे असलेले कालीघाट मंदिर देशातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ते 200 वर्षे जुने आहे. बहुतेक भाविक येथे देवी काली यांना प्रसन्न करण्यासाठी बकऱ्यांचा बळी देतात. जे नंतर भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जाते.

मुनियांदी स्वामी मंदिर, तामिळनाडू
तामिळनाडूतील मदुराई येथील मुनियांदी स्वामी मंदिर मांसाहारी प्रसादासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात, भगवान मुनियांदी ज्यांना भगवान शिवाचे अवतार मानले जाते. त्यांना प्रसाद म्हणून चिकन आणि मटण बिर्याणी अर्पण केली जाते. ही बिर्याणी नंतर भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटली जाते. तर अशी ही पाच मंदिरे आहेत जिथे देवालाही मांसाहार आणि मद्याचा भोग दिला जातो आणि भक्तांमध्येही प्रसाद म्हणून वाटला जातो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.