सांगली : महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा परतावा दोन महिन्यांपासून रुग्णालयांना मिळालेला नाही. राज्यभरातील ३५ जिल्ह्यांतील रुग्णालयांची थकबाकी ६४७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या योजनेंतर्गत उपचारांची बिले आरोग्य हमी सोसायटीकडे पाठविली जातात. तेथे ४५ दिवसांत मंजुरी मिळून रुग्णालयांकडे पैसे जमा होतात. मात्र, दोन महिने झाले, तरी पैसे मिळालेले नाहीत. याचा मोठा ताण छोट्या रुग्णालयांवर पडत आहे.
जिल्हानिहाय थकीत रक्कम
अहिल्यानगर - ४४,१४,९७,१७०अकोला - १५,०७,४५,०४०अमरावती - १८,२६,५५,०००बीड - १०,०५,४०,१६०भंडारा - १७,५१,२०००बुलढाणा - ९,३१,७६,३४०चंद्रपूर - १,७५,६२,२००छत्रपती संभाजीनगर - ४८,६६,४७,४७०धाराशिव - ३,२०,९४,७५०धुळे - १६,२५,३८,५८०गडचिरोली - ५२,३६,६००गोंदिया - २,९३,३८,७६०हिंगोली - ९६,३३,३००जळगाव - १७,३७,२१,१७०जालना - १५,३६,७५०कोल्हापूर - ३४,०३,३,२२०लातूर - १२,४७,५४,३७०मुंबई व मुंबई उपनगर - ४४,६०,७५,३२०नागपूर - ३९,५९,९९,३२०नांदेड - १५,९२,९२,५६०नंदुरबार - २,७०,९३,९१०नाशिक - ८०,४५,९०,९५५पालघर - ३,०६,३५,२००परभणी - २,३७,१७,४२०पुणे - ४६,५२,४८,५६५रायगड - १२,०५,८७,८३०रत्नागिरी - ६,३७,१३,७२०सांगली - २५,२२,८७,७६०सातारा - २०,१०,१५,३००सिंधुदुर्ग - २,७८,५६,६२०सोलापूर - २९,१८,६९,७६०ठाणे - ३९,२९,८२,६७०वर्धा - १४,५७,८०,७००वाशिम - ५,९४,१९,२५०यवतमाळ - ४,७६,६४,५००एकूण : ६४७ कोटी ७६ लाख ८८ हजार २४० रुपयेरुग्णालयांची बिले थकली असली, तरी एकही रुग्ण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. गरजू व पात्र रुग्णांवर या योजनेतून उपचार सुरू आहेत. - डाॅ. सुभाष नांगरे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले योजना
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.