महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 'इतक्या' वर्षांनी वाढणार ? समोर आली मोठी अपडेट
महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आता अधिक काळ सेवा देता येणार आहे. कारण की सरकारकडून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय चेंज केले जाणार अशी बातमी समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचे वय किती?
सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष इतके आहे एवढेच नाही तर देशातील जवळपास 25 हुन अधिक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 60 वर्षे एवढे निश्चित करण्यात आले आहे. विशेष बाब अशी की महाराष्ट्रात देखील
असे काही कर्मचारी आहेत ज्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे.
राज्य शासकीय सेवेतील ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय
60 वर्षे एवढे फिक्स करण्यात आले आहे मात्र राज्यातील अ, ब आणि क या
संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे. हेच
कारण आहे की राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे
एवढे झाले पाहिजे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारी
कर्मचाऱ्यांकडून सातत्याने सरकार दरबारी उपस्थित केली जात आहे. यासाठी
सरकारकडे जोरदार पाठपुरावा देखील सुरू आहे.
राज्य सरकारची भूमिका काय ?
गेल्या
शिंदे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला
जाईल अशी ग्वाही दिली होती. स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे
देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीच्या समर्थनार्थ होते. त्यांनी
कर्मचाऱ्यांची ही मागणी आम्ही लवकरच पूर्ण करू असे आश्वासन दिले होते पण
काही संघटनांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून सरकारच्या या भूमिकवर प्रश्न
उपस्थित केले जाऊ लागलेत आणि हा विषय मागे पडला. पण आता पुन्हा एकदा हा
विषय चर्चेत आला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार?
खरे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्याबाबत राज्य सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाहीये. पण, राज्य शासकीय सेवेतील रिक्त पदांची आकडेवारी सतत वाढत आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकूण 7.19 लाख पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी दोन लाख 92 हजार 570 पदे रिक्त आहेत. विशेष बाब अशी की डिसेंबर अखेरीस यामध्ये आणखी 5289 रिक्त पदांची भर पडणार आहे. कारण की राज्य शासकीय सेवेतून दरवर्षी तीन टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. दुसरीकडे राज्य शासनाकडून त्या तुलनेने नोकर भरती केली जात नाही.हेच कारण आहे की सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा शासनाकडून विचार होऊ शकतो अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. खरं तर राज्य शासनाकडून अनेक विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केली जात आहे. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अधिक जबाबदारी सुद्धा सोपवता येणार नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे अधिक जोखीमीची कामे सोपवता येणार नाहीत म्हणून आणि लगेचच सरकारला हजारो रिक्त पदे भरता येणे अशक्य आहे, याच सर्व गोष्टींचा विचार केला असता सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षं वरून 60 वर्ष केले जाईल असा दावा होऊ लागला आहे. मात्र सरकारने याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही यामुळे खरंच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार का? ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.