मिरजमध्ये १८ लाखाचा गुटखा साठा जप्त; पोलिसांनी केले तस्करीचे रॅकेट उध्वस्त:, महात्मा गांधी चौक पोलीसांची कारवाई
सांगली : कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात तस्करी होत असल्याची चर्चा असताना त्यावर कारवाई होत नव्हती. मात्र मिरजच्या महात्मा गांधी पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कर्नाटकातून जेरबंद केले आहे. नशामुक्त अभियानांतर्गत कारवाई केली असून या कारवाईत सुमारे १८ लाख रुपयांचा गुटखा जप्त करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सांगलीच्या मिरजेमध्ये सुगंधी तंबाखूसह गुटखा पान मसाल्याची विक्री करण्यास राज्यात प्रतिबंध असतानाही कर्नाटकातून माल आणून विक्री केली जात होती. सदर गुटखा विक्रीच्या तयारीत असलेली आंतरराज्य टोळी मिरजच्या महात्मा गांधी पोलीस चौकीने जेरबंद केले आहे. मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मुजावर याला ताब्यात घेऊन केलेल्या तपासणीत त्यांच्याकडे ८२ हजार सहाशे रुपयाचा सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला होता.
कर्नाटकातील रॅकेट उध्वस्त
दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुजावर याने हा माल कर्नाटकातून आणल्याचे व सांगली जिल्ह्यातील पान दुकानदारांना तो चढ्या दराने विकला जाणार होता असे सांगितले. त्यानंतर या टोळीची पाळीमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी पथक तयार करून कर्नाटकात पाठवले. यात विक्री वितरण याची साखळी असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मुख्तार मुजावर, नवीन शेख, कुडचे यांच्याकडून सुगंधी तंबाखू गुटखा व पान मसाला असा तब्बल १७ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.