Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण

अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
 

'सैयारा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. तरुणांमध्ये या चित्रपटाची भलतीच क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर लोक थिएटरमध्ये ढसाढसा रडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 'सैयारा' हा चित्रपट पाहिल्यानंतर दोन मुलं गर्लफ्रेंडवरून एकमेकांशी भिडल्याची घडना घडली आहे.

थिएटरबाहेर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दोन मुलांमध्ये गर्लफ्रेंडवरून झालेल्या या राड्याच्या व्हिडीओ काढला. जो आता तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'सैयारा' चित्रपट पाहण्यासाठी काही तरुण ग्वाल्हेरच्या पडाव पोलीस स्टेशन परिसरातील डीबी मॉलच्या सिनेमा हॉलमध्ये पोहोचले होते. चित्रपट पाहिल्यानंतर मुलं बाहेर आली, तेव्हा दोन तरुणांमध्ये गर्लफ्रेंडवरून वाद झाला.

वाद इतका वाढला की, दोघेही थिएटरबाहेर एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करू लागले. सैयारा पाहिल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली. दोघांमधील भांडण पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली. या हाणामारीच्या घटनेबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात सैयारा चित्रपट पाहिल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. काकादेव परिसरात तरुणाने गळफास घेत स्वत:ला संपवलं. लखन शुक्ला असं २४ वर्षीय तरुणाचं नाव आहे. मागील २ महिन्यांपासून तो घटस्फोटित महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.