पुणे :-गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेसचे आंदोलन सुरु
पुण्यातील रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न एकाने केला. हातात कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलीय. सुरज शुक्ला असं त्याचं नाव आहे.
त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, घडललेल्या घटनेनंतर काँग्रेसकडून स्टेशन परिसरात आंदोलन केलं जाणार आहे.
गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं रक्षण काँग्रेस करणार आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेसकडून हे निषेध आंदोलन होणार आहे. सकाळी अकरा वाजता हे आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.
रविवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं डोकं एका व्यक्तीनं उडवण्याचा प्रयत्न केला. सुरज शुक्ला असं त्याचं नाव आहे. पुतळ्याच्या चौथऱ्यावर तो हातात कोयता घेऊन चढला होता. काही लोकांनी त्याला धरून खाली खेचल्यानं पुढील अनर्थ टळला. पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केलीय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.