एलन मस्कच्या टेस्ला या बहुचर्चित कंपनीचे दालन आता मुंबईत उघडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वांद्रे कुर्ला- बीकेसी येथील मेकर मॅक्सिटी माॅलमध्ये या शोरुमचा शानदार उद्घाटन सोहळा आज १५ जुलै रोजी सकाळी पार पडला. टेस्लाचे हे भारतातील पहिले शोरुम आहे. त्यामुळे आता भारतातील इव्ही युगाला आणखीनच मोठी चालना टेस्लाच्या स्वरुपात मिळाली आहे. आज झालेल्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला कंपनीचे भारतात स्वागत केले आहे. टेस्ला वेलकम टु इंडिया असे म्हटले आहे. जरी टेस्ला भारतात आली असली तरीही सामान्य माणसांना किंवा मध्यमवर्गीयांना टेस्ला परवडणारी आहे का? टेस्ला इव्ही कारच्या किमती किती आहेत हे जाणून घेऊया.
टेस्लाचे Y माॅडेल भारतात उपलब्ध होणार, किंमत किती?
मिडिया रिपोर्टनुसार, टेस्ला सुरुवातीला भारतात मॉडेल Y च्या दोन आवृत्त्या देत आहे. रियर-व्हील ड्राइव्ह मॉडेलची किंमत ₹60.1 लाख म्हणजेच($70,000) सत्तर हजार डाॅलर आहे.लॉन्ग-रेंज व्हेरिएंटची किंमत ₹67.8 लाख म्हणजेच ($79,000) एकोनऐंशी हजार डाॅलर रुपयांना उपलब्ध होईल.चीन, अमेरिकेपेक्षा भारतात टेस्लाची कार महागहिंदुस्तान टाईम्सनुसार, टेस्लाचे हे माॅडेल इतर बाजारपेठांच्या तुलनेत भारतात महाग आहे. या किमती लक्षणीयरीत्या जास्त आहेत - अमेरिकेत याच वाहनाची सुरुवात ₹ ३८.६ लाख ($४४,९९०) ने होते.या कारची चीनमध्ये ₹३०.५ लाख ($३६,७००) चीनच्या चलनानुसार (२६३,५०० युआन) किंमत आहे.जर्मनीमध्ये ₹४६ लाख ($५३,७००) (€४५,९७० युरो) पासून होते - ही तफावत मुख्यत्वे भारतातील जास्त आयात शुल्कामुळे आहे म्हणून या कार इतर बाजारपेठांपेक्षा महाग आहेत.
किंमती सामान्यांना परवडणाऱ्या आहेत का?
खरंतर टेस्लाच्या किमतीचे हे आकडे मिडिया रिपोर्टनुसार आहेत,या आकड्यांचा विचार करता टेस्लाची इव्ही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. एका कारसाठी भारतातील सामान्य माणूस ६० लाख रुपये खर्च करत नाही असा अनुभव आहे तर निम्न मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गातही टेस्लाची या किमतीतील कार परवडणारी नाही अशी अनेकांची मतं आहेत.
कोण आहे टेस्लाचे भारतातील टार्गेट?
कोणतेही उत्पादन जेव्हा बाजारात येते तेव्हा ते विशिष्ट लक्ष्यगट ठरवून येते, म्हणूनच टेस्लाही या धोरणाचा विचार करते आणि जास्त किंमत असूनही, टेस्ला भारतातील श्रीमंत शहरी ग्राहकांना लक्ष्य करेल अशी अपेक्षा आहे, ज्यामध्ये BMW आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या जर्मन ऑटोमेकर्सचे वर्चस्व असलेल्या प्रीमियम EV सेगमेंटमध्ये ती सामील होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.