मस्क अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष? केली अमेरिकेच्या राजकारणात भूकंप घडवणारी घोषणा
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्ला आणि स्पेस एक्सबरोबरच 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक अशी ओळख असलेले अमेरिकी उद्योजक एलोन मस्क यांनी राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं आहे.
अवघ्या वर्षभरापासून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यासाठी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचं रान पिंजून काढणाऱ्या एलोन मस्क यांनी आता थेट ट्रम्प यांनाच आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच एलोन मस्क यांनी एका नवीन पक्षाची घोषणा केली आहे. मागील अनेक दशकांपासून द्विपक्षीय राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या या नव्या पक्षाच्या माध्यमातून तिसरा पक्ष सहभागी होणार असल्याची शक्यता असल्याने मस्क यांची नवी घोषणा अमेरिकी राजकारणात भूकंप घडवणारी असल्याचं मानलं जात आहे.
ट्रम्प यांचे निकटवर्तीय
अमेरिकेचे अध्यक्ष आणि एलोन मस्क यांच्यातील बिघडलेल्या संबंधांना आणखी एक वादग्रस्त वळण मिळाले आहे. खरं तर, ट्रम्प यांच्या अगदी जवळचे असलेले एलोन मस्क यांनी एका नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. यापूर्वी मस्क यांनी ट्रम्प यांना इशारा दिला होता की जर 'वन बिग ब्युटीफुल बिल' मंजूर झाले तर अमेरिकेत एक नवीन पक्ष स्थापन केला जाईल.
पक्षाचं नाव काय?
एलोन मस्क यांनी त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव 'अमेरिका पार्टी' असे ठेवले आहे. मस्क यांनी एक्सवर सांगितले की ट्रम्प यांचे, 'बिग ब्युटीफुल बिल' अमेरिकेला दिवाळखोरीत काढेल. एलोन मस्क यांनी एक्सवर राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.
एक्सवरुन केली घोषणा
एक्स प्लॅटफॉर्मवर मस्क यांनी आपल्या फॉलोअर्सला नवीन अमेरिकन राजकीय पक्ष स्थापन करावा का? असे विचारल्यानंतर एका दिवसामध्ये, मस्क यांनी शनिवारी एका पोस्टमध्ये घोषणा केली की आज, तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य परत देण्यासाठी 'अमेरिका पार्टी' स्थापन करण्यात आली आहे.
बिग ब्युटीफुल बिलाला विरोध
यापूर्वी, टेस्लाचे मालक मस्क म्हणाले होते की, राष्ट्रपतींनी 'बिग ब्युटीफुल बिल' मांडल्याने आपण निराश झालो आहोत. 'सीबीएस'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, हे विधेयक केवळ एक मोठा खर्च आहे असं नाही तर ते त्यांच्या सरकारी कार्यक्षमता विभागाच्या प्रयत्नांनाही कमकुवत करत आहे. यामुळे संघीय तूट वाढत आहे.
मस्क अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती बनतील
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर, स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी अखेर त्यांचे वचन पूर्ण केले आणि एक नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासात, दोन पक्षांनी बराच काळ राज्य केले आहे. परंतु टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी द अमेरिका पार्टी नावाचा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे. ट्रम्प यांच्या अनेक समर्थकांनी सोशल मीडियावरुन भविष्यात एकदिवस नक्कीच मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ट्रम्प हे सुद्धा आधी मस्क यांच्याप्रमाणे एक उद्योजकच होते. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची पुढील निवडणूक 2028 साली होणार आहे. म्हणजेच मस्क यांच्याकडे तयारीसाठी तीन वर्ष आहेत.
60 टक्क्यांहून अधिक लोकांचा
नवीन पक्षाची सुरुवात करताना मस्क म्हणाले की, देशाला एका पक्षीय व्यवस्थेपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने त्यांच्या ट्विटर हँडलवर एक नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी जनमत चाचणी देखील घेतली होती, ज्यामध्ये 60 टक्क्यांहून अधिक लोकांनी त्याला पाठिंबा दिला होता. 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांना उघडपणे पाठिंबा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी मस्क एक होते. त्यांनी रिपब्लिकन पक्षाला सुमारे 270 दशलक्ष डॉलर्सची देणगी देखील दिली, ज्याने ट्रम्प यांच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.