Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा
 

राज्यात स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. सरकारकडून गेल्या पाच सहा महिन्यांपासून बदल्यांचं सत्र सुरु आहे.काही दिवसापूर्वीच राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. आता परत राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली आदेश 
1) श्री अजीज शेख, भाप्रसे, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई. येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे. या पदावर.

2) श्री अशीमा मित्तल, भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.येथून जिल्हाधिकारी जालना या पदावर.

3) श्री श्रीकृष्णनाथ पांचाळ, भाप्रसे, जिल्हाधिकारी, जालना. येथून जिल्हाधिकारी, ठाणे या पदावर.

4) श्री विकास खारगे, भाप्रसे, मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई येथून अप्पर मुख्य सचिव महसूल मंत्रालय, मुंबई या पदावर

5) श्री अनिल डिग्गीकर, भाप्रसे, अप्पर मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई येथून अपर मुख्य सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय,मुंबई या पदावर

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.