आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. व्हिडीओकॉन कंपनीला ३०० कोटींचं कर्ज मंजूर करण्यासाठी चंदा कोचर यांनी ६४ कोटींची लाच स्वीकारल्याचा आरोप होता. अपीलीय न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आहे. व्हिडीओकॉन कंपनीला ३०० कोटींचं कर्ज दिल्यानंतर त्या बदल्यात ६४ कोटींची रक्कम चंदा कोचर यांच्या पतीच्या कंपनीला देण्यात आली होती.
ट्रिब्यूनलनं सुनावणीनंतर निकाल देताना स्पष्ट केलं की लाचेची देवघेव ही स्पष्ट होती. आय़सीआयसीआय बँकेनं २७ ऑगस्ट २००९ रोजी व्हिडीओकॉनला ३०० कोटींचं कर्ज दिलं. पुढच्याच दिवशी व्हिडीओकॉनची कंपनी एसपीएलने दीपक कोचर यांची कंपनी न्यूपॉवर रिन्यूएबल्सला ६४ कोटी पाठवले. ट्रिब्यूनलने हा क्विड प्रो क्वो असल्याचं सांगितलं. कर्जाच्या बदल्यात लाच देण्याचा हा प्रकार आहे.चंदा कोचर यांच्यावर बँकेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. कर्ज मंजूर करताना त्यांनी पतीचे व्हिडीकॉन कंपनीशी व्यावसायिक संबंध आहेत हे सांगितलं नाही. हितसंबंधाच्या नियमांचं हे उल्लंघन होतं. चंदा कोचर यांना त्यांच्या पतीच्या कामाची माहिती नव्हती असं सांगू शकत नाहीत असंही न्यायालयाने म्हटलं. ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या पतीची ७८ कोटींची मालमत्ता जप्त केली होती. ही कारवाई योग्य असल्याचंही ट्रिब्यूनलने म्हटलं. यात मुंबईत चर्चगेटजवळ असलेल्या त्यांच्या फ्लॅटचा समावेश आहे. मात्र १०.५ लाखांची रोकड परत देण्यात आली. कोचर दाम्पत्याने या रकमेबाबत पुरावे दिले होते. सध्या चंदा कोचर आणि दीपक कोचर हे जामीनावर बाहेर आहेत. पण त्यांच्यावर खटला सुरू आहे. कोचर यांनी फसवणूक केल्याचं आणि बँकेला नुकसान पोहोचवल्याचं सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. व्हिडीओकॉनला दिलेलं कर्ज नंतर बुडालं आणि यामुळे आयसीआयसीआयला मोठा फटका बसला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.