आमदार गोपीचंद पडळकरांकडून विधानभवनात बनावट दुधाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दूध भेसळ कशी केली जाते याचं प्रात्यक्षिकच त्यांनी विधानभवानाच्या आवारात दाखवलं आहे. तसंच, या भेसळयुक्त दुधामुळं
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा दावा पडळकरांनी केला आहे.
त्याचबरोबर, दूध भेसळीविरोधात कडक कायदा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विधानभवनाच्या आवारातच दूध भेसळ कशी होते याचा लाईव्ह डेमो दिला आहे. लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे, असा आरोप गोपीचंद पडखळकरांनी केला आहे. काही ठिकाणी दुधात तेल टाकले जाते. तसंच दुधाचा रंग तसाच राहावा यासाठी त्यात चुना टाकला जातो. तसंच, दुधासारखाच वास यावा यासाठी देखील केमिकल वापरले जाते. या प्रकाराने 1 लिटरचे दूध 10 लिटर होते, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी प्रत्यक्ष लाइव्ह डेमोदेखील दाखवला आहे. दुधात युरिया सुद्धा टाकला जातो. यामुळंच डेअरीवाले गब्बल झालेत. एका लिटरचे जर 10 लिटर होत असेल तर मग शेतकऱ्यांना पैसे कसं मिळणार? मुंबईतील लोक रात्रं दिवस राबून पैसे देतात आणि दूध घेतात यात मुंबईकरांची काय चूक आहे? असा सवाल गोपीचंद पडखळकरांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळायला हवा, म्हणून ही भेसळ थांबायला हवी, असंदेखील त्यांनी म्हटलं आहे.राज्यात म्हशीचं 80 ते 90 लाख लिटर दूध तयार होतं. एकाबाजूला शेजाऱ्यांना दुधाचा धंदा परवडत नाही कारण भेसयुक्त दूध सध्या उपलब्ध आहे बाजारात. दूध माफियांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. भेसळ मोठ्या प्रमाणात होते याबाबत जी कारवाई होते त्यामुळे कायदा कडक केला पाहिजे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. अजामीनपात्र शिक्षा झाली पाहिजे. भेसळीच्या कायद्यात बदल केला पाहिजे. तिकडे तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या वाढायला पाहिजे, ही मागणी आम्ही लावून धरणार आहेत. म्हणूनच आम्ही या भेसळीचा प्रयोग महाराष्ट्राला दाखवला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.