Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदींच्या वाराणसीत एकच व्यक्ती कसा झाला '50 जणांचा पिता'? मतदार यादी व्हायरल, अखेर सत्य समोर

मोदींच्या वाराणसीत एकच व्यक्ती कसा झाला '50 जणांचा पिता'? मतदार यादी व्हायरल, अखेर सत्य समोर
 

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील एक मतदार यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सर्वाधिक चर्चा एका पत्त्यावरुन झाली. कारण बी २४/१९ या पत्त्यावर ५० पेक्षा अधिक मतदार राहतात आणि सगळ्यांचे वडील एकच आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसनं यावरुन निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. याबद्दलचं सत्य अखेर समोर आलं आहे. 
 
एकाच पत्त्यावर ५० जण आणि सगळ्यांच्या वडिलांचं नाव एकच, ही बातमी देशभर चर्चेचा विषय ठरली. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आलेले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी निवडणूक लढवली होती. राय यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. मतांच्या चोरीमुळे मोदी जिंकून आल्याची टीका त्यांनी केली होती.

नेमकी परिस्थिती, नेमकं वास्तव काय?
व्हायरल झालेल्या मतदार यादी २०२३ ची आहे. यात १३ मुलांचं नाव ३७ वर्षांचे, ५ मुलांचं वय ३९ वर्षे, ४ जणांचं वय ४० वर्षे, २ मुलांचं वय ७२ वर्षे आणि अन्य मुलाचं वय ४२ वर्षे आहे. बी २४/१९ हा आचार्य रामकमल दास यांनी स्थापन केलेल्या राम जानकी मठ मंदिराचा पत्ता आहे. मतदार यादीत कोणतीच गडबड नसल्याचं मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या रामभरत शास्त्री यांनी सांगितलं. 'आमचा आश्रय गुरु शिष्य परंपरेनुसार चालतो. इथे वैराग्य, विरक्ती घेतलेले शिष्य स्वत:च्या गुरुलाच वडील मानतात. कारण त्यांची संसारिक बंधन तुटलेली असतात. त्यामुळेच इथल्या अनेकांच्या वडिलांच्या नावाच्या जागी रामकमल दास यांचं नाव दिसतं. हा प्रकार बेकायदेशीर नाही. गरीब मुलं अनाथ आश्रमात येतात. ते विरक्ती स्वीकारतात. तेव्हा त्यांना त्यांचे गुरु वडील म्हणून स्वत:चं नाव देतात,' अशी माहिती रामभरत शास्त्री यांनी दिली. रामकमल दास यांचं नाव घेऊन प्रश्न उपस्थित करणाऱ्यांबद्दल शास्त्री यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर काही राजकीय पक्ष या सगळ्याची चुकीच्या पद्धतीनं मांडणी करत आहेत. आम्ही त्यांच्या बुद्धीच्या शुद्धीकरणासाठी राम जानकी मंदिरात प्रार्थना करु, असं शास्त्री म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.