Big Breaking! मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या PIचा खळबळजनक दावा; 'सरसंघचालक मोहन भागवतांना धरून आणा, असा मला आदेश होता'
सोलापूर :- मालेगाव बॉम्बस्फोटातील सात आरोपींची मुंबईतील विशेष एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) न्यायालयाने तब्बल 17 वर्षांनंतर पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या त्यावेळी एटीएस पथकातील पोलिस निरीक्षक महिबूब मुजावर यांंनी या प्रकरणावर मोठे भाष्य केले आहे. 'सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणण्याचे आदेश त्यावेळी मला देण्यात आले होते,' असा खळबळजनक दावाही मुजावर यांनी केला आहे.
महिबूब मुजावर हे सध्या निवृत्त झाले असून त्यांनी यापूर्वीही मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासात अनेक चुका आहेत. अनेकांना त्यात गोवण्यात आले आहे, असे सांगून तसे पत्रही मुजावर यांनी कोर्टात दिले होते. त्याच मुजावर यांनी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर समाधान व्यक्त केले.
मुजावर म्हणाले, मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास खोटा आहे, त्यात लोकांना गोवण्यात आले आहे. रामजी कलसंग्रा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आलेला आहे. तरीही त्यांचा तपास करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. हे लोक जीवंत आहेत, हे दाखण्यासाठी छापेमारीची कारवाई, ते मी केलं. पण माझ्या लक्षात आलं की, हे सर्व खोटं आहे आणि आपला त्यात वापर करण्यात येत आहे.
या तिघांच्या तपासाशिवाय मला एक गोपनीय आदेशही देण्यात आला होता. 'सरसंघचालक मोहन भागवत यांना धरून आणा', असा आदेश मला देण्यात आला हेाता. अटक करून नव्हे तर धरून आणा, असा तो आदेश होता, ते बेकादा असल्यामुळे मी ते केले नाही. या सर्व प्रकरणाचा तपास झाला, सर्व घटना घडल्या. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की, मला सर्व गोष्टी माहिती आहेत. त्यांना पाहिजे ते काम माझ्या हातून झाले नाही, त्यामुळे त्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असेही महिबूब मुजावर यांनी नमूद केले.ते म्हणाले, फक्त गुन्हे दाखल करून थांबले नाही तर मला अटकही करण्यात आली. त्या प्रकरणात मी सात ते आठ वर्षे गुरफून राहिलो. पण त्या प्रकरणातून मी निर्दोष सुटलो. मी निर्दोष सुटल्यानंतर त्यात काही माझं म्हणणं होतं. सीआरपीसी 313 नुसार मी जबाब दिला. त्यामध्ये या खोट्या तपासाबाबत मी सांगितले. सर्व प्रकार मी कथन केला आहे. तीच कागदपत्रे यातील आरोपींना पुरविण्यात आली.एसटीचे तत्कालीन प्रमुख परमवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मी हे काम करत होतो. दररोज मी त्यांना फीडबॅक देत होतो. न्यायालयाने आज दिलेल्या निकालाविषयी समाधान आहे. आजच्या जजमेंटमध्ये माझी भूमिका आली असेल तर माझ्याएवढा भाग्यवान कोणी नाही, असेही मुजावर यांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.