राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिंदे गटात तुफान राडा झाला आहे. श्रेयवादावरून दोन जिल्हाप्रमुख आपसात भिडले आहेत. यामुळे शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते, त्यांनी इथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, त्यांची बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच शिवसेना शिंदे गटात राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गडचिरोलीमध्ये शिवसेना शिंदे गटात तुफान राडा झाला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते, त्यांनी गडचिरोलीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना झाले, दादा भुसे हे चंद्रपूरला रवाना होताच, दोन जिल्हाप्रमुख एकमेकांवर भिडले, दोन जिल्हाप्रमुखांमध्ये श्रेय वादावरून तुफान राडा झाला, गडचिरोलीच्या सर्किट हाऊसमध्ये ही घटना घडली आहे.
शिवसेनेचे गडचिरोलीचे जिल्हाप्रमुख संदीर ठाकूर आणि अहेरीचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यामध्ये हा राडा झाला आहे. दादा भुसे यांची गडचिरोलीच्या सर्किट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. त्यामुळे जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं या बैठकीसाठी हजर होते, मात्र त्यानंतर मंत्री दादा भुसे चंद्रपूरकडे रवाना होताच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेय वादावरून हमरीतुमरी झाली आणि ते एकमेकांवर भिडले, या घटनेमुळे काही काळ बैठकीच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला.
अंतर्गत वाद चव्हाट्यावर
मंत्री दादा भुसे हे आज गडचिरोली दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी गडचिरोलीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, या बैठकीला मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते, मात्र त्यानंतर दादा भुसे गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे रवाना होताच तिथे जोरदार राडा झाला, दोन जिल्हा प्रमुख आपसात भिडले, श्रेयवादावरून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे, आता या प्रकरणात पक्ष काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणामुळे तिथे चांगलाच गोंधळ उडाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.